*’गाड़ी वाला आया, घर से कचरा निकाल’*
*पाटणसावंगीत रुजविले स्वच्छतेचे संस्कार*
‘देख-देख-देख तू यहां वहां न फेंक
देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल…
तो का करे भैया?
गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल,
गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल…’
*पाटणसावंगी ग्रामपंचायतचा उपक्रम*
*विशेष प्रतिनिधी पाटणसावंगी*
पाटणसावंगी- वरिल गाणे तर सगळ्यांनी ऐकलेच असेल, या गाण्याच्या प्रेमात संपूर्ण पाटणसावंगीतील लोक आहेत. कारण आहे स्वच्छतेचा संदेश देणारे ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे. जे आज प्रत्येकाच्या ओठांवर आहे.सकाळपासून ते रात्रीपर्यंत हे गाणे सतत वाजत असते आणि या गाण्याचा स्वर कानावर पडला रे पडला, सगळे ‘अलर्टमोड’मध्ये असतात. भीतीने नव्हे तर कौतुकाने. पाटणसावंगी ग्रामपंचायतचे स्वच्छतादूत गाडी घेऊन फिरतात आणि सोबतीला रेकॉर्डवर हे गाणे असते. घराघरातील कचरा गोळा करुन तो गावाबाहेर नेण्यासाठी पाटणसावंगी ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा गाड्या सुरू केल्या आहेत. सहा महिनाभरापासून ही कचरा गाड़ी एक बिशिष्ट हिंदी गीत नागरिकांना फेरफटका मारत कचरा गोळा करते.
हे गीत लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या मुखपाठ झाले आहे. सदर गीत कानावर पडताच घरातील व्यक्ती कचरा घेऊन तातडीने घराबाहेर येतात.शिवाय छोटे मुले गाणे ऐकून नाचायला लागतात.
‘गाड़ी वाला आया, घर से कचरा निकाल‘ हेच ते गीत आहे, जे रोज कचरा गाडीवर ऐकायला मिळते.तसेच सर्वांच्या तोंडपाठ झाले आहे, या गीताचा सकारत्मक परिणाम होतानाही दिसून येतो. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाटणसावंगी ग्रामपंचायत प्रशासनाने गाव स्वच्छ ठेवण्याचा निर्णय घेत गावातील कचरा गोळा करण्यासाठी कचरा गाडी सुरु केली. त्या वाहनावर राजू देवके नावाच्या व्यक्तीची चालत म्हणून नियुक्ती केली आहे.
या गीताचे रचनाकार व गायक मध्य प्रदेशातील मंडला येथील रहिवासी श्याम बैरागी आहेत.ते एक प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. हे गीत जगभरात ऐकले-वाजवले जात आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार मंडला नगर परिषदेकडून त्यांना स्वच्छतेवर एक गीत लिहिण्यास सांगण्यात आले होते. मंडला नगर परिषदेनंतर खंडवा जिल्ह्यातील इतर चार नगर परिषदांनीही स्वच्छता अभियानासाठी हेच गाणे निश्चित केले. मग मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा सरकारने या गाण्याची निवड त्यांच्या त्यांच्या राज्यात व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांना मनोरंजनात्मक शैलीत स्वच्छता अभियानाशी जोडण्यासाठी केली.
* पाटणसावंगी ग्रामपंचायत प्रशासनाने याच गीताचा वापर करीत जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि ते गीत पाटणसावंगी वासीयांच्या मनात उतरले.*