*आत्मनिर्भर भारत अभियान२०२०* *२० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा- पंतप्रधान नरेंद्र मोदी* *दररोज 2 लाख पीपीई किट आणि एन 95 मास्क चा उत्पादन आपल्या भारतात तयार होत आहे*

*आत्मनिर्भर भारत अभियान२०२०*

*२० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा- पंतप्रधान नरेंद्र मोदी*

*दररोज 2 लाख पीपीई किट आणि एन 95 मास्क चा उत्पादन आपल्या भारतात तयार होत आहे*

विशेष प्रतिनिधि-
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज २० लाख कोटी रुपयांचे आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करताना दिली.

हे पॅकेज दिवसरात्र मेहनत करणारे शेतकरी, मध्यमवर्गीय, कुटीर उद्योग, गृह उद्योग, लघु-मध्यम उद्योग, एमएसएमई उद्योग जगतासाठी आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्ध करण्यासाठी या पॅकेजमध्ये जमीन, मजूर, लिक्विडिटी, कायदा यावर भर दिला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ७० हजारांवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती.

३ मे रोजी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत लॉकडाऊन तीनवेळा वाढविला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ७०,७५६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २,२९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा सर्वांधिक आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले….

-मानवजातीच्या कल्याणासाठी भारत खूप काही देऊ शकतो

– एक राष्ट्राच्या रुपाने आज आम्ही एका महत्वाच्या वळणावर उभे आहोत

– प्रत्येक दिवशी देशात २ लाख पीपीई, २ लाख एन ९५ मास्क बनविले जात आहेत

-आत्मनिर्भर भारत हाच यावरील मार्ग आहे- पंतप्रधान

-संपूर्ण जग जीवन वाचविण्यासाठी लढत आहे- पंतप्रधान मोदी

-असे संकट कधी पाहिले नाही, कधी ऐकले नाही- पंतप्रधान मोदी

-स्वतःला वाचवायचे आहे आणि पुढेही जायचे आहे- पंतप्रधान मोदी

– एका व्हायरसने जगाला उद्वस्त केले आहे

-जगातील कोट्यवधी लोक कोरोना संकटाचा सामना करत आहेत

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …