लाकडाऊन मुळे मानसिक आरोग्याविषयी समस्या मध्ये वाढ -श्रीमती नीरजा बिर्ला

लाकडाऊन मुळे मानसिक आरोग्याविषयी समस्या मध्ये वाढ

श्रीमती नीरजा बिर्ला

कोरपना प्रतिनिधी-गौतम धोटे

कोरपनाकोविड -१९ साथ आणि पाठोपाठ सरकारने जाहिर केलेला राष्ट्रीय लॉकडाऊन यामुळे मानसीक आरोग्याविषयी समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसते आहे . सामाजीक विलगीकरणामुळे लोकांच्या मनात हरवून गेल्याची भावना दाटु लागली असुन इतरांपर्यत कसे पोहचावे , कसे व्यक्त व्हावे हे त्यांना कळेनासे झाले आहे. मानसिक आरोग्यसेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विश्वासार्ह व्यासपिठ पुरविण्यासाठी आम्ही ए मपॉवर या आघाडीच्या मानसिक आरोग्यसेवा पुरवठादारांबरोबर भागीदारी करुन ही टोल – फ्री हेल्पलाइन सुरु केली आहे . या साथीच्या उद्रेकासोबत सुरु असलेल्या संयुक्त लढाईतुन आपण अधिक ताकदवान बनुन बाहेर पडण्यासीठी महाराष्ट्रातील नागरीकांना या सेवेचा जास्तीत जास्त वापर करीवा , याला आमचे प्रेात्साहन राहील असे श्री प्रविण परदेशी ,महापालीका आयुक्त , मुंबई म्हणाले .

” आजवरच्या एका सर्वात मोठ्या आरोग्यविषयक संकटाचा जग सामना करत आहे , त्यात शीरीरिक आरोग्य सर्वोच्च महत्वाचे आहे, माञ,दीर्घकाळाचे विलगीकरण आणि अनिश्चित तेचे वातावरण यामुळे ढळणा-या मानसीक आरोग्याकडे दुर्लक्ष् होण्याची शक्यता आहे . कसोठीच्या काळात चिंतित आणि तणावग्रस्त वाटणे स्वाभाविक आहे आणि आता आपण सहज असण्याची आणि आपल्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्याची आजवर कधी नव्हती एवढी गरज आहे बीएमसी – एमपॉवर वनअॉनवन हेल्पलाइनच्या माध्यमातुन मानसिक आरेग्याविषयक जागरुकता वाढवण्याचा आणि ते महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आटोक्यात आणण्याचा आमचा उद्देश आहे .श्री आदित्य ठाकरे (पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंञी), श्री राजेश टोपे, (सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंञी), डॉ संजय मुखर्जी (सचिव, प्रविण परदेशी, महापालीका आयुक्त, मुंबई या महाराष्ट्र सरकारच्या मान्यवरांनी या उपक्रमाला दिलेले सक्रिय पाठबळ आणि सहकार्य याबध्दल आम्ही त्यांचे रु्णी आहेत . या आव्हानात्मक काळात महाराष्ट्रतील नागरीकांनी मोकळेपणाने बोलावे आणि मदत घ्यावी, असे आम्ही सगळे मिळुन आवाहन करीत आहोत, “असे श्रीमती नीरजा बिर्ला, संस्थापक आणि अध्यक्ष एमपॉवर म्हणाल्या .

एमपॉवर ही देशभरातील मानसिक आरोग्यविषयक समस्यांशी लढणारी आघाडीची संस्था आहे. कोविड – १९ साथीच्या काळात, गेल्या महिन्याभरात ए मपॉवरला चिंता, तणाव, निराशा, संभ्रमविकृती (पँरानोइया) यासारख्या मानसिक आरोग्यविषक समस्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे . या समस्यांना संबोधित करण्यासाठी ए मपॉवर टेलिफोनवरिल संभाषणे, अॉनलाइन चँट, व्हिडिआे कॉलिंग यासारख्या आभासी माध्यमांतुन लोकांना या टप्प्यातुन पार होण्यासाठी समुपदेशन आणि उपचार पुरवत आहे. त्याचबरोबर एमपॉवर पालक, तरुण व्यावसायिक आणि कुटुंबांना रोजच्या परिस्थितीची अधिक चांगली हाताळणी करण्यासाठी आरोग्यविषयक सल्ले आणि टिप्सही देत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …