*मोहफुलाच्या पोत्याने लादलेला ट्रक पकडला*
*केळवद पोलिस स्टेशनची मोठी कार्यवाही*
*मोहफुल भरलेल्या ट्रक सह मुद्देमालाचा 25 लाखाचा मोठा साठा ताब्यात केळवद*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*नागपूर– सावनेर तालुक्यातील केळवद पोलिस स्टेशनची मोठी कार्यवाही मोहफुल भरलेल्या ट्रक मधला मोठा साठा ताब्यात घेण्यात आला कोरोना वायरस प्रादुर्भाव निमित्त्याने संपूर्ण भारतात लागू करण्यात आला आहे त्यानिमित्त त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील एम.पी. बॉर्डर जवळ खुर्सापार हायवे रोड आरटीओ चेक पोस्ट लावण्यात आला आहे. त्यावर २४ तास पोलिसांची ड्युटी असते.*
*येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून सोडली जाते. आज दिनांक ११-५२०२० रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान आर.टी.ओ चेक पोस्ट वर एक पिवळ्या रंगाचा 12 चक्का ट्रक क्रमांक आर.जे.२० जी.ए.८८८५ हा येताना दिसला. पोलीस स्टॉप गाडी थांबून वाहनचालकास नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव राजू हिंदूजी ओडे वय ५८ वर्ष राहणार खडवदा रोड बोलामंगरा वार्ड क्र.१ गरोठ पोलिस स्टेशन गरोठ जि.मंदसोर मध्यप्रदेश सांगितले. ट्रक मध्ये काय आहे असे विचारले असता त्यांनी ट्रक मध्ये मोहफुल असून मोहाफुल हा पिपलोद जिल्हा बडोदा गुजरात गावाजवळ असलेले मिल मधून लोड केला आहे. व हामाल रायपूर ला घेऊन जात असल्याचे सांगितले. ट्रकचालकास मालकाचे व ट्रकचे कागदपत्रे ताब्यात घेऊन कागदपत्रे तपासणी केली असता. ट्रक मध्ये एकू ६२५ बोरी मोह फुल प्रत्येक बोरी ४०किलोग्राम असे एकूण २५००० कि.ग्रा. असल्याचे आढळून आले.* *त्यामुळे त्यांच्या जवळून मोहा फुल वाहतूक बाबत शासकीय परवाना विचारले असता त्यांनी कोणत्याही प्रकारच्या शासकीय परवाना नसल्याचे सांगितले. व सदर मोहफुल हा हितेश कुमार जगदीश कुमार शहा राहणार पिपलोद गुजरात यांच्या असून त्यांनी मोहफुल ला कुठलाही परवाना घेण्याची आवश्यकता नसून सदर माल सायन ए.बी.एस. ट्रेडर्स रायपूर गुजरात येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्यावरून सदर माल अवैध असल्याचे आमची खात्री पटल्याने आम्ही सदरची माहिती पोलीस स्टेशन केळवद येथे दिली. काही वेळातच आर.टी.ओ.चे पोस्ट खुर्सापार येथे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अशोक सरंबळकर साहेब पोलीस स्टेशन येथे आले.*
*ताब्यात असलेले ट्रक चालक आरोपी व त्यांच्यासोबत असलेला, वाहक नामे मोहनलाल गौतम लाल राहणार मुंडा सेल तालुका घाटोल तालुका मुरसेड जिल्हा बासवाडा राजस्थान यांना ताब्यात घेऊन त्यांची सदर मुद्दे मालाचा पंचासमक्ष सविस्तर जप्ती पंचनामा कारवाई करून १२ चक्का ट्रक क्रमांक आर.जे.२० जी.ए.८८८५ कि.१९,००,००० रुपये व मोहाफुल चे एकुण ६२५ बोरी प्रतेकी बोरी ४० कि.ग्रा.असे एकूण २५००० कि.ग्रा.एकूण कि.६,००,००० रुपये चा मुद्देमाल असा एकुण २५,००,००० रु.माल ताब्यात घेतला.*
*यातील वाहनचालक नामे राजू हिंदूजी ओडे वय ५८ राहणार खडवदा रोड बोलामंगरा वार्ड क्र.१ गरोठ पो.स्टे.गरोठ जि.मंदसोर मध्यप्रदेश व सोबत असलेल्या वाहन नामे मोहलाल गौतमलाल कटारा रा.मुडासेल ता.घाटोल राजस्थान यांनी हीतेचंद्र जगदीशचंद्र शाह याचे सांगण्यावरुण मोहाफुल गावठी दारु काढण्याचा कच्चा मालाचा उपयोग करून गावठी दारूच्या उत्पादनासाठी वापर करून सामाजिक आरोग्य नुकसान करण्याच्या व शासनाच्या महसूल उडविण्याचा हेतूने बेकायदेशीर री रित्या व विनापरवाना एकूण ६२५ बोरी प्रत्येकी बोरी ४० कि.ग्रा.असे एकूण २५००० कि.ग्रा.एकूण ६,००,००० रुपये चा माल व १२ चक्का ट्रक क्र. आर.जे.२० जी.ए.८८८५ कि.१९,००,००० रुपये मध्ये भरुण वाहतुक करतांना मिळूण आल्याणे आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन केळवद येथे अपराध क्र.११७/२०२० कलम ६९,८१,८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वेये गुन्हा दाखल करुण पुढींल तपास स.पो.नि.सुरेश मट्टामी पोलिस स्टेशन केळवद हे करित आहे*