*कोवीड़ 19 मुळे महाराष्ट्रात वाढली मोहफुलाची मागणी* *मोहफुलासह 32 लाखाचा मुद्देमाल जप्त* *केळवद ठाणेदार सुरेश मट्टामी ची कारवाई*

*कोवीड़ 19 मुळे महाराष्ट्रात वाढली मोहफुलाची मागणी*

*मोहफुलासह 32 लाखाचा मुद्देमाल जप्त*

*केळवद ठाणेदार सुरेश मट्टामी ची कारवाई*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
सावनेर – कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढुर्णा हायवे क्र.47 वरील महाराष्ट्र एम.पी.बॉर्डर येथील खुर्सापार आर.टि.ओ. चेक पोस्ट येथे तपासणी करीत असतांना 20 हजार रूपये किमतीचे 25 हजार किलो विना परवाना मोहफुल कर्मशियल रामसागर रायपुर (छत्तीसगड) ला घेउन जात असतांना जप्त करून आरोपीस अटक करण्यात आले.

ft

ही कारवाई केळवद पोलिसांद्वारे खुर्सापार चेक पोस्टवर दि.12 रोजी 6ः35 वा. करण्यात आली. सुदामा सुरभ पवार (40)रा. अंबाळा ता. आमला. जिल्हा बैतुल,मध्यप्रदेश व त्याचे सोबत असलेला वाहक नामे मनोहर शामराव धुर्वे वय २७ वर्ष रा.जामगाव, पोस्ट सांवगा ता. मुलताई, जि. बैतुल मध्यप्रदेश असे आरोपींचे नांव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार दि.12.5.2020 चे रोजी सायंकाळी 06ः35 वा. दरम्यान कोरोणा वायरस प्रादुभाव निमीत्ताणे संपुर्ण भारतात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्या निमीत्ताणे पोलीस स्टेशन केळवद हददीतील नागपुर, पांढुर्णा हायवे क्र. 47 वरील महाराष्ट्र एम.पी.बॉर्डर येथील खुर्सापार आर.टि. ओ.चेक पोस्ट येथे पोलीसांची तपासणी नाका लावण्यात आले आहे. त्यावर 24 तास पोलीसांची डयुटी असून येणा-या जाणा-या वाहणाची तपासणी करुनच सोडली जाते. दरम्यान डयुटीवरील पोलीसांना आर.टि.ओ चेक पोस्ट वर एक अशोक लेलॅन्ड 14 चक्का ट्रक क्र.एम.पी.09 एच.एच.2562 हा येतांना दिसला. पोलीस स्टे. यांनी ट्रक थांबवून वाहन चालकास नाव,गाव विचारले असता त्याने आपले नाव सुदामा सुरभ पवार वय 40 वर्ष रा.अंबाळा ता.आमला. जिल्हा बैतुल, मध्यप्रदेश असे सांगत ट्रक मध्ये मोहाफुल असुन मोहाफुल हा चिचोली जि. बैतुल मध्यप्रदेश येथुन लोड केले असून हा माल कर्मशियल रामसागर रायपुर (छत्तीसगड) ला घेउन जात असल्याचे सांगीतले.

ट्रक चालकास मालाचे व ट्रक चे कागदपत्रे ताब्यात घेउन कागदपत्रे तपासणी केली असता इन्व्हाईस टॅक्स पर्ची मध्ये एकुण 625 पोते मोहाफुल प्रत्येक बोरी 40 कि.ग्रा. असे एकुण 25,000 कि.ग्रा. असल्याचे आढळुन आले. तसेच बालाजी वेट ब्रिज भिमपुर रोड चिचोली बैतुल म.प्र. काटयावर मालाचे वजन 29 टन 770 कि.ग्रा. असे दिसुन आले. त्यामुळे याचे जवळ ट्रक मध्ये असलेल्या मोहफुल वाहतुक बाबत शासकीय परवाना विचारले असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा शासकीय परवाना नसल्याचे सांगीतले व सदर मोहाफुल हरनारायण भैयालाल राठोड रा.पाढेर जि.बैतुल (मध्यप्रदेश) याचा असुन त्यांनी मोहफुल ला कुठलाही परवाना घेण्याची आवश्यक्ता नसुन सदर माल कर्मशियल रामसागर रायपुर छत्तीसगड येथे घेउन जाण्यास सांगीतले.

त्यावरुन सदर माल अवैध असल्याचे खात्री पटल्याने सदरची माहीती पोलीस स्टेशन केळवद येथे दिली. काही वेळातच आर.टि.ओ. चेक पोस्ट खुर्सापार येथे पोलीस स्टेशन केळवद येथुन स.पो. नि.सुरेश मट्टामी, ए.एस.आय अमरदिप कामठे,पो.हवा. अमर झिने, अरुन गुंठे,सचिन येळकर, सह खुर्सापार आर टि.ओ. चेक पोस्ट येथे आले, ताब्यात असलेले ट्रक चालक आरोपी, व वाहक मनोहर शामराव धुर्वे (27) वर्ष रा.जामगाव, पोस्ट सांवगा ता. मुलताई, जि. बैतुल मध्यप्रदेश यांना ताब्यात घेउन त्यांनी सदर मुददेमालाचा पंचासमक्ष सविस्तर जप्ती पंचनामा कार्यवाही करुन अशोक लेलॅन्ड कंपनीचा 14 चक्का ट्रक क्र. एम.पी. 09 एच.एच. 2562 कि.20,00,000 रु. व मोहाफुल. चे एकुण 29 टन 770 कि.ग्रा.एकुण कि.12,00,000 रु. चा मुददेमाल असा एकुण 32,00,000 रु. चा माल ताब्यात घेतला. यातील वाहन चालक नामे सुदामा सुरभ पवार वय 40 वर्ष रा. अंबाळा ता. आमला. जिल्हा बैतुल, मध्यप्रदेश व सोबत असलेला वाहक नामे मनोहर शामराव धुर्वे वय 27 वर्ष रा. जामगाव, पोस्ट सांवगा ता. मुलताई, जि, बैतुल मध्यप्रदेश यांनी हरनारायण भैयालाल राठोड रा. पाढेर, जिल्हा बैतुल मध्यप्रदेश याचे सांगण्यावरुन मोहाफुल गावठी दारु काढण्याचा कच्चा मालाचा उपयोग करुण गावठी दारुच्या उत्पादनासाठी वापर करुन सामाजिक आरोग्यास नुकसान करण्याचा व शासनाच्या महसुल बुडविण्याचा हेतुने बेकायदेशीर रित्या व बिनापरवाना एकुण 29 टन 770 कि. ग्रा. एकुण कि.12,00,000 रु. चा माल व अशोक लेलॅन्ड कंपनीचा 14 चक्का ट्रक क्र.एम.पी. 09 एच.एच. 2562  किंमत, 20,00,000 रु. मध्ये भरुन वाहतूक करतांना मिळून आल्याने पोलीस स्टेशन केळवद अप.क्र. 120/2020 कलम 69,81,83 महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

पुढील तपास  पोलीस अधिक्षक, राकेश ओला, नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण, अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राउत, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर, सावनेर., याचे मार्गदर्शनात स.पो.नि. सुरेश मट्टामी ठाणेदार पोलीस स्टेशन केळवद, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी विक्रम मंडे, पोलीस स्टेशन केळवद नापोशी सचिन खरबडे, दाउद मोहम्मद, राजेश कुंभरे, उत्पादन शुल्क विभागाचे अब्दुल रहीम अब्दुल, निरीक्षक, बालु भगत दुयम निरीक्षक राजेद्र केवट,बाघाजी बोमले, अमरदिप कामठे, अमर झिने,अरुण गुंठे,येळकर करीत  आहे. 

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …