*जिल्ह्यात मीठाचा तुटवडा नाही : जिल्हाधिकारी दीपक सिंगला*
*अफवांवर विश्वास ठेवू नये*
गडचिरोली प्रतिनिधी -सूरज कुकुडकर
गडचिरोली – जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मीठाचा तुटवडा असल्याची अफवा पसरली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात कुठेही मीठाचा तुटवडा नसून मोठ्या प्रमाणात मीठ साठा उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले आहे.
गडचिरौली,कोरची, कुरखेडा व धानोरा तालुक्यांमध्ये काही लोकांकडून मीठाचा तुटवडा असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी जादा रक्कम देऊन मीठ खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले. जिल्ह्यात मीठाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत किंवा जादा पैसे देऊन मीठ खरेदी करू नये. अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी मीठ खरेदी केल्यामुळे संबंधित तालुक्यांत मीठ संपल्याचे समोर आले आहे. मात्र, जिल्ह्यात मीठाचा मुबलक साठा असून अकारण मीठ खरेदी करून साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मीठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
*जिल्हाधीकारी यानी केले आवाहन*
दुकानदारांनीही ग्राहकांकडून जादा रक्कम घेऊन मीठ विक्री करू नये, तसेच त्यांना खरी माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अचानक वाढलेली मागणी व बाजारपेठेतील मीठाची झालेली कृत्रिम टंचाई याबाबत प्रशासनाने दखल घेतली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा व कोणतीही अफवा असल्याचे लक्षात आल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान आज कुरखेडा येथेही मीठ खरेदीसाठी दुकानात रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिस निरीक्षकांनी दुकानदारांशी संपर्क साधून ग्राहकांना मीठ उपलब्ध करुन देण्यास सांगितले. बाजारात पुरेसे मीठ उपलब्ध असून, कुणीही अतिरिक्त रक्कम देऊन मीठ खरेदी करु नये, असे आवाहनही पोलिस निरीक्षकांनी केले आहे.
*गडचिरौली शहरात ही पसरली अफवा*
दरम्यान आज गड़चीरोली येथेही मीठ खरेदीसाठी दुकानात रांगा लागल्या होत्या. यावेळी प्रशासनाने दुकानदारांशी संपर्क साधून ग्राहकांना मीठ उपलब्ध करुन देण्यास सांगितले. बाजारात पुरेसे मीठ उपलब्ध असून, कुणीही अतिरिक्त रक्कम देऊन मीठ खरेदी करु नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.