*वैनगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू*

*वैनगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू*

गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर

गडचिरोलीगडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील खरकाडा गावाजवळच्या वैनगंगा नदीत बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. प्रा.पद्माकर तानबा मडावी (४२) रा.कोरेगाव चोप व संजय मारोती उके(४०), रा.कुरुड, ता.देसाईगंज अशी मृतांची नावे आहेत.

प्रा.मडावी हे ब्रम्हपुरी तालुक्यातील निलज येथील ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते. ब्रम्हपुरी येथे भाड्याच्या घरात ते वास्तव्य करीत होते. कोरेगाव चोप येथे राहणाऱ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते तेथे गेले होते. त्यांना भेटून प्रा.मडावी यांना ब्रम्हपुरीला यावयाचे होते. परंतु ई-पास शिवाय आंतरजिल्हा प्रवास करता येत नसल्याने ते कोरेगाव येथून कुरुड येथील संजय उके या मित्राकडे गेले. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा घाटावरुन नदी पार केली की खरकाडा घाटावरुन थेट ब्रम्हपुरी तालुक्यात प्रवेश करता येतो. त्यामुळे प्रा.मडावी यांनी शॉर्टकट मार्ग शोधला. कुरुड येथे गेल्यानंतर उके यांनी प्रा.मडावी यांना खरकाडा घाटापर्यंत सोडून दिले. नदीच्या अलीकडील कोंढाळा घाटाच्या काठावर त्यांनी मोटारसायकल ठेवली. त्यानंतर ते आंघोळ करण्यासाठी नदीत उतरले. पाण्याची पातळी वाढत होती. संजय उके यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. प्रा.मडावी यांना पोहता येत असल्याने ते उके यांना वाचविण्याचा प्रयत्न करु लागले. परंतु पाणी वाढू लागल्याने तेसुद्धा बुडून मृत्युमुखी पडले. आज सकाळी त्यांचे मृतदेह आढळून आले. ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांच्याही मृतदेहांचे विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह स्वगावी पाठविण्यात आले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …