*इंदाळा येथील पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करा- आमदार डॉक्टर देवरावजी होळी* *इंदाळा येथे तातडीने टँकरने पाणीपुरवठा करा आमदार महोदयांची प्रशासनाला सूचना*

*इंदाळा येथील पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करा- आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

*इंदाळा येथे तातडीने टँकरने पाणीपुरवठा करा आमदार महोदयांची प्रशासनाला सूचना*

गढ़चिरौली प्रतिनिधि-सूरज कुकुडकर

गडचिरोलीगडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत इंदाळा पारडी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. येथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने टॅंकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती विलास देशमुख पारडी चे सरपंच संजयजी निखारे उपस्थित होते
*इंदाळा येथे पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे ही योजना अजून पर्यंत पूर्णत्वास येऊ शकले नाही. जवळपास पूर्ण झालेले काम थोड्याशा अडचणीमुळे थांबल्याचे ग्रामस्थांनी सांगितले ती अडचण तात्काळ दूर करून इंदाळा येथील पाणीपुरवठा योजना सुरू करावी व त्या माध्यमातून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही आमदार डॉक्टर देवरावजी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …