मोवाड शहरात आता पर्यतच्या कोरोना प्रादुर्भावा रोखणेसाठी झालेला प्रवास
मोवाड प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे
आज च्या परिस्थितीत जगावर महाभंयकर कोविड19 कोरोना विषाणूणे थंयमाण घातले
आहे .आणि या संकटा पासून भारत देश कसा मुक्त राहीला भारतात
पण कोरोनाविषाणूणे प्रवेश केला याला रोखण्यासाठी भारत सरकारने लाँकडाउन हा पर्याय निवडला व यासाठी राज्यच्या सिमा ,जिल्हाचे सिमा,व नगरपरिषदेच्या सिमा ,गावचे सिमा बंदोबस्त करणेचे आदेश संस्थानिक शासनाला देण्यात आले. या आदेशा पासून मोवाड नगर परिषद कशी मुक्त राहील व मोवाड नगरपरिषदेला पण आदेश आला व येथून सुरु झाला कोरोनाप्रादुर्भावा रोखणेच्या प्रवास
मोवाड नगर परिषद म्हणजे अगदी 9,000 लोकवस्ती असलेलं परंतु गावात प्रवेश करण्याकरिता तीन मार्ग *एक म्हणजे मध्य प्रदेश राज्याची सीमा*
*दुसरी अमरावती जिल्याची सीमा*
*आणि तिसरा मार्ग नरखेड वरून येणार*
आणि पोलीस चौकी ला तीनच स्टाफ आणि त्यांच्या कडे गाव 6-7 मग कोरोना विषाणू पासून गावच रक्षण करणे ही गरजेचं मग सुरवातीला तयार झाले ते गावातील 12 स्वयंसेवक गावात फक्त दवाखान्यात जाण्याकरिताच ये-जा सुरू ठेवली परंतु बंदोबस्ता साठी स्वयंसेवक कमी पडू लागली .मग पुन्हा 22 स्वयंमसेवक वाढवले आणि तिन्ही पण नाकेवर अगदी काटेकोर बंदोबस्त केले गेला.याला अगदी पहिले पासून आरोग्य विभागाची साथ मिळाली थर्मल चेकिंग करूनच गावात प्रवेश आणि त्यांची नोंद आणि मोबाईल नोद घेऊनच प्रवेश देने सुरू केले मग फक्त प्रश्न राहिला तो मध्य प्रदेशातून येणाऱ्या गावठी दारूचा तो सुद्धा मुख्याधिकारी साहेब पोलीस विभाग आणि स्वयंमसेवक यांच्या मदतीने ते सुद्धा बंद केली. मग गावातील गोर-गरीब कुटुंबाचा पोटाचा प्रश्न त्या साठी किराणा-धान्य किट 600₹ प्रति मूल्याच्या 180 किट तयार करून गरजू कुटुंबा पर्यन्त पोहचावल्या या करिता गावातील काही नागरिकांनी मदत केली हा उपक्रम मागील 54 दिवसापासून अविरत पणे सुरू आहे .या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची स्तुती संपूर्ण समाज माध्यमातून होत आहे.याची योग्य प्रकारे अबलबजावणी पाहणे साठी व कोरोना योध्दाचे मनोधैर्य वाढवणेसाठी महाराष्ट्र राज्यचे ग्रहमंत्री अनिल देशमुख भेट व खासदार कूपाल तुमाने ,नागपूर जिल्हा पालकमंत्री सुनील केदार,श्रीकांत उबरकर,काटोल उपविभागीयअधिकारी ,
तहसीलदार हरीष गाडे सलील देशमुख जिल्हा परिषद सदस्य,याचे वेळोवेळी मार्गदशन लाभले आणि हे सगळं शक्य झालं ते मा.मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम साहेब न.प. मोवाड विघ्नं गायकवाड तालुका वैचारिक अधिकारी याकार्यला मोवाड शहरातील 36 तरुण स्वयंसेवकाची मिळाली दिवस रात्र मिळालेली सेवा ही पण कोरोनच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिशय मोलाची आहे. व सोबत नगर परीषद
कार्मचारी शिक्षक कार्मचारी ,पत्रकार, याचे पण अतिशय मोलाचे सहकार्य वेळोवेळी लाभले