*खैरी ढालगाव येथील 48 वर्षाची पाण्याची टाकी कोसळली*
*कोणतीही जीवीत हानी नाही*
*विशेष प्रतिनिधी सावनेर*
*सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव येथील 58 हजार लिटर ची पाणी पुरवठा ची पाण्याची टाकी अकस्मात कोसळली. सन 1972 ला गावाला पाणीपुरवठा करण्याकरिता फाटे विद्यालय जवळ हनुमान मंदिरा लगत 48 वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधण्यात आली असून आज जीर्णावस्थेत होती टाकीचे पिल्लर जीर्ण झाले असता 17 मे च्या मध्यरात्री 2.30 ला टाकी कोसळली रात्रीची वेळ असल्याने जीवित हानी टळली*.
*सकाळी गावात टाकी कोसळल्याची बातमी पसरताच गावातील नागरिकांची गर्दी उसळली यात विविध चर्चेला पेव फुटले थोड्या अंतरावर रहिवाशी घरे असल्याने फार मोठे नुकसान टळले. गावात दुसरी पाण्याची टाकी असल्याने पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.*
*सकाळी ग्रामपंचायत शिपाई हरिराम वाट नळ सोडायला आला तेव्हा ही घटना त्याला दिसली व त्याने ही बातमी सरपंच व सचिव यांना दिली. जुन्या वस्तीतील नागरिकांना आज पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तात्काळ जनतेला पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी जनतेनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली.*