*तायवाडे फार्मसी कॉलेज तर्फे पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझर तसेच O R S ज्युस वाटप*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
नागपुर–कोरोना विषाणू व्हायरस चा देशभर महामारिचा थैमान घातले व झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे भारतीय नागरिक झुंज देत आहे. यावेळी नागपुरात कार्यरत असलेले सचिदानंद शिक्षण संस्थे’च्या वतीने तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी च्या माजी विद्यार्थिनी पोलिसांना ओआरएसव सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. आज जेव्हा नागपूरचे तापमान 40 सेल्सिअसच्या वरती असल्यावरही पोलिस आपली सेवा लोकांना अविरत देत आहे. अशा प्रसंगी इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा फार्मसी ची विद्यार्थिनी पोलिसांना ORS ज्युस वितरण केले. याप्रसंगी तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. डोईफोडे तसेच डिप्लोमा फार्मसीचे प्राचार्य विक्रांतची चिलाटे यांनी विद्यार्थ्याचे प्रोत्साहित केले.या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. बबनराव तायवाडे संस्था प्रमुख होते.प्रा. अभिजीत दरवडे प्रमुख माजी विद्यार्थी प्रमुख आदिल शेख प्रफुल लावंगे, चेतन मेश्राम व सामाजिक कार्यकर्ता निखिल भुते, विवेक मनराल व कुणाल मेश्राम यांची उपस्थिती होती. या सामाजिक कार्यात महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी प्राध्यापक यांनी आपली सेवा दिली. यावेळी प्रणय बोरीकर यांनी कार्यक्रमाची सूत्रसंचालन केले. महाराष्ट्रातील पोलिसांनी यावेळी तायवाडे फार्मसी कॉलेज चे मनपूर्वक आभार मानले.