*कोरोना ब्रेकिंग* *गडचिरोलीत तीन वेगवेगळया ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइनमधील 3 लोकांचे नमुने पॉझिटीव्ह* *काल रात्री उशिरा आले अहवाल* *तीनही व्यक्ती जिल्हयाबाहेरून आलेले*

*कोरोना ब्रेकिंग*

*गडचिरोलीत तीन वेगवेगळया ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइनमधील 3 लोकांचे नमुने पॉझिटीव्ह*

*काल रात्री उशिरा आले अहवाल*

*तीनही व्यक्ती जिल्हयाबाहेरून आलेले*

*गडचिरोली(जिल्हा माहिती कार्यालय, वृत्त दि.18 मे )* : गडचिरोली जिल्हयात बाहेरून आलेल्या व प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्या तीन प्रवाशांचे कोरोना कोविड नमुने काल रात्री पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे. यामध्ये कुरखेडा येथील वेगवेगळया दोन क्वारंटाईन सेंटरचा व चामोशीमधील एका क्वारंटाईन सेंटरचा समावेश आहे. संबंधित कोरोना बाधित व्यक्तींना जिल्हा रूग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये हलविण्यात आले आहे. संबंधित रूग्णांकडून त्यांच्या प्रवासाचे तपशिल घेणे सूरू आहे. संबंधित पॉझिटीव्ह आलेल्या प्रवाशांना आरोग्य विभागाकडून दि.16 मे रोजी जिल्हयात प्रवेश केल्यानंतर संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते.

जिल्हयातील नागरीकांना व बाहेरून आलेल्या प्रवाशांनी अधिक काळजी घेणे आता गरजेचे असून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आवाहन केले आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …