*पीकअप व्हँन नी चिरडले*
*दुचाकी चालकाचा जागीच मु्त्यू*
*प्रतिनिधी दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेर–केळवद वरून सावनेर कडे भरधाव येणाऱ्या बोलेरो पिकअप मालवाहू गाडीने हेटी वरून सावनेर कडे येणाऱ्या स्प्लेडर ला धडक दिल्याने स्पेल्डर चालकाला जागीच मृत्यू झाला*
*ही घटना आज सकाळी १०.३० च्या सुमारास सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सावनेर छिंदवाडा रोडवर मंगल बार जवळ घडली मंगेश जगदीश मेश्राम ४५ रा.हेटी असे मृतकाचे नाव असुन तो जेसीपी चालक असुन आपल्या कामावर जात असल्याची माहीती निधून येत आहे*
*मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी १०.३० च्या सुमारास बोलेरो पिकअप मालवाहू गाडी क्र. एम एच ४० बी एल ४५९४ ही केळवद वरून सावनेर कडे येत असताना हेटी कडून सावनेर कडे येणाऱ्या स्पेल्डर क्र. एम एच४० व्ही ९४४६ ला निष्काळजी पणाने धडक दिल्याने स्पेल्डर चालक मंगेश जगदीश मेश्राम ४५ रा.हेटी याचा जागीच मृत्यू झाला..घटनेची माहिती सावनेर पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी गाठून घटनास्थळ पंचनामा करुन शवविच्छेदन करिता रवाना आले सावनेर पोलिसांनी पिकअप वाहन व चालक जीवन कृष्णा गायधने वय २६ यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सावनेर पो.नि.अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात ए पी आय जुनोनकर हे करीत आहे..*