*वरोरा ब्रेकिंग*
*वरोरा शहरात दोन रुग्ण पाॅझिटिव्ह*
*जनतेत भितीचे वातावरण*
वरोरा प्रतिनिधी- मूजम्मील शेख
*वरोरा येथील विलिनीकरणात असलेले एक दाम्पत्य चंद्रपूर येथे कोरोना बाधित आढळून आले*
*हे दाम्पत्य कोरोनाचा हाॅटस्पाट ठरलेल्या पुणे या रेडझोन मधून १५ मे रोजी वरोडा येथे येत असतांना पाटाळा या चंद्रपूर जिल्ह्याच्या चौकीवर पोलीसांनी अडविले व चौकशी केली असता पुणे येथून आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी पती पत्नीला वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता या दाम्पत्याला येथील आंबेडकर वसतीगृहात क्वारंटाईन करण्यात आले होते*
*यानंतर १८ मे रोजी या कोरोना संशयित या दाम्पत्याला चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. चंद्रपूर येथे त्यांचे स्लॅब घेण्यात आले.आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच शहरात खळबळ माजली.*
*पत्नीचे माहेर वरोडा येथील असून चिमूर येथे असलेल्या तिच्या मोठया बहिणीचे दु:खद निधन झाल्याने ती चिमूरला जाण्यासाठी आली असावी अशी माहिती समोर येत आहे .वरोडा येथे वसतीगृहात क्वारटाईन असताना माहेरची मंडळी त्यांना भेटली काय? भेटली असल्यास माहेरच्या मंडळीच्या संपर्कातील साखळी शोधण्याचा प्रयत्न सुरू होणे गरजेचे आहे*