*शिक्षण बचाव आंदोलन*
*सरकारच्या अपयशाचा निषेध करणार*
*शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दयावा-अनील शिवणकर*
मुख्य संपादक-किशोर ढूंढेले
*नागपूर – कोरोनाच्या नावाखाली शिक्षण क्षेत्रात गोंधळ वाढत चालला असून शालेय शिक्षण विभाग कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने शिक्षणमंत्री उदासीन आहेत का…?,असा प्रश्न उपस्थित होत आहे*
*शिक्षण व्यवस्था अडचणीत आली असून शिक्षण विभागात सरकार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या व शासनाच्या निषेधार्थ भाजपा शिक्षण आघाडी राज्यभर 22 मे रोजी महाराष्ट्रात शिक्षण बचाव आंदोलन करणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीच्या कल्पना पडले,उल्हास फडके, अनिल शिवणकर यांनी सांगितले आहे लोक डॉन चे सर्व नियम पाळून शिक्षण उपसंचालक तसेच प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांचे मार्फत शिक्षक मंत्र्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला जाणार आहे.*
*इयत्ता दहावी भूगोल विषयाच्या गुणांचा तीडा असूनही कायम असल्याचे 1600000 पालक संभ्रमात आहेत यावर शिक्षण विभागाने व एसएससी बोर्डाने ठोस निर्णय घेतलेला नाही शिक्षण मंत्री अद्यापही बोलायला तयार नाहीत,दहावी ते बारावी या निकालाच्या तारखा अद्याप घोषित झालेल्या नाहीत, यासोबतच पुढील शैक्षणिक वर्षांची शाळांची नियोजन अध्यापन केले नसल्यामुळे शाळा कधी सुरू होतील, कशा सुरू होतील विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी घेता येईल याबाबत पालकांना व शाळांना अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आली नाही. शाळांमधील विद्यार्थी प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आली नाही विद्यार्थी संख्येअभावी पुढील शैक्षणिक वर्गात वर्षात शिक्षकांना अतिरिक्त करण्यात येऊ नये असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही*
*अश्या अनेक तांत्रिक अडचणी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने चालवीलेल्या उपाययोजने मुळे संपूर्ण शिक्षण तंत्रात असमंजस्याच्या स्थितीत येऊण ठेवला आहे यावर शासनाने लवकरात लवकर लक्ष दिले नाही तर अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्रा सोबतच शैक्षणिक संस्था डबघाईस येऊन अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळा नाकारता येत नाही करीता शासनाने तात्काळ उपाययोजना आखून शिक्षण व शैक्षणिक विभागाचे संरक्षण करावे अशी विनंती करण्यात येत आहे*