*दहेगाव कोरोना ब्रेकिंग*
*22 पैकी 19 चा अहवाल निगेटिव्ह*
*अफवांवर लक्ष देऊ नये*-दिपक कारंडे (सावनेर तहसीलदार)
मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
*सावनेर – तालुक्यातील दहेगाव येथे सापडलेल्या एक कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या परिवारासह इतर 22 संशयितांची मेडिकल हाँस्पिटल नागपूर येथे कोरोना तपासणी करुण त्यांना आमदार निवास नागपूर येथे कोरंटाईन करण्यात आले होते*
*त्यांच्यातील 19 लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित तीन लोकांचा अहवाल अद्यापही प्राप्त झाला नसल्याची माहीती दहेगाव ग्राम पंचायत चे सरपंच प्रकाश गजभिये यांनी दीली असून उर्वरित तीन लोकांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.*
*अफवांवर लक्ष देऊ नये*-
दिपक कारंडे (सावनेर तहसीलदार)
*शनिवार ला सावनेर तालुक्यातील दहेगावात कोरोना पाँजेटिव्ह रुग्ण आढल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या अफवांना उधाण आले असुन सावनेर नागपूर मार्गावरील बोरूजवाडा येथील सावनेर पब्लिक स्कुल येथे संशयित रुग्णांना कोरंटाईन केले आहे,त्यांची संख्या वाढत आहे,रुग्ण दगावला अश्या सोशल मीडियावर या अफावा पसरत आहे.अश्या अफवांवर लक्ष न देता शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमीत आदेशाचे पालन करुण घरीच राहून प्रशासनास मदत करण्याची विनंती तहसीलदार दिपक कारंडे यांनी केली आहे*