प्रेरणादायी :- माणुसकी धर्म जोपासुन छोटूभाई यांनी स्वखर्चाने एका अज्ञात व्यक्तीचा केला अंतिम संस्कार!
वरोरा प्रतिनिधी – मूजम्मील शेख
काही दिवसापासून उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतांना अज्ञात व्यक्तीचा काल झाला होता म्रुतु !
वरोरा :-शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळ गावा.जवळ काही दिवसापूर्वी अनोळखी इसम जखमी अवस्थेत पोलिसांना मिळाला होता ही माहीती वरोरा पोलिसांना मिलताच त्यांनी त्याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात केले होते मात्र त्या दरम्यान पोलिसांनी सगळीकडे ही माहीती वायरलेस द्वारे व इतर माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहचवली परंतु त्याच्या कुठल्याही नातेवाईकांना ही माहीती गेली नव्हती व त्याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. सादर व्यक्ती अनोळखी असल्याने व त्याचे कुणी नातेवाईक नसल्याने त्याचा अंतिम संस्कार करणार कोण ? हा प्रश्न होता मात्र वरोरा शहरात व तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर व दिन दलित शोषित पीडितांना मदत करण्यास नेहमीच तत्पर असणाऱ्या छोटूभाई शेख वरोरा नगरपरिषद बांधकाम सभापती. ताथ काँग्रेस कामगार जिल्हाध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने त्या अज्ञात व्यक्तीच्या अंतिम संस्काराचा खर्च उचलला आणि दिनांक 23 मे.ला. दुपारी 2 वाजता. वणी नाका चौकाजवळील समशान भूमीमधे अंतिम संस्कार दफन विधी पार पाडला, यावेळी स्वतः सार्वजनिक बांधकाम सभापती तथा काँग्रेस असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष छोटू भाई शेख व इतर सहकार्य करणारे व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहून अंतिम विधीस सहकार्य केले.
जात धर्म पंथ या पलीकडे जावून मानवी मूल्य जपणाऱ्या छोटूभाई शेख सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची आज समाजाला गरज असून दुखात संकटात आणि अडिअडचणित नेहमीच जनेतेचा आवाज ठरलेल्या छोटूभाईनी अज्ञात व्यक्तीच्या अंतिम संस्काराचा खर्च उचलून म्रूतकाच्या आत्म्याला शांती मिळाली आणि सोबतच समाजाला एक प्रकारे प्रेरणा मिळाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.