*ब्रेकिंग न्यूज* *कोकर्डा टेकडीवरील झाडावर गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला युवक* *12 मे ला सकाळी कुणालाही न सांगता घरून निघाला होता* *आत्महत्या की घातपात तपासाअंती निश्पन्नास येणार* (पो.नी.अशोक कोळी सावनेर)

*ब्रेकिंग न्यूज*

*कोकर्डा टेकडीवरील झाडावर गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला युवक*

*12 मे ला सकाळी कुणालाही न सांगता घरून निघाला होता*

*आत्महत्या की घातपात तपासाअंती निश्पन्नास येणार*

(पो.नी.अशोक कोळी सावनेर)

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी दिनेश चौरसीया*

*सावनेरः शहरातील पंचशील नगर येथील 23 वर्षीय युवक मनोज धनराज पाटील हा घरी कुणलाही काही न सांगता घरुण निघून गेला होता त्या संदर्भात त्याचे वडील धनराज पाटील यांनी पोलीस स्टेशन सावनेर येथे घरुन निघून गेल्याची तक्रार नोंदवून शोध घेण्याची विनंती केली केली होती.सदर घटनेची दखल घेत पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सदर युवकाचे शोधकार्य ही सुरु होते*


*आज दि.26 मे रोजी सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील कोकर्डा परिसरातील टेकडीवरील एका झाडावर युवकाचे गळाफास लावून असलेले शव असल्याची सुचना प्राप्त होताच सावनेर पोलीसांनी घटनास्थळ गाठून झाडावर झुलत असलेले युवकाचे मु्तदेह खाली उतरून घटनास्थळ पंचनामा करुण शव विच्छेदनास प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे रवाना केले*


*सदर मु्तदेह हा मनोज उर्फ लाला पाटील याचा असल्याचे स्पष्ट होताच आप्तेष्टांन सोबतच पंचशील नगर तसेच मीत्र परिवारात शोककळा पसरू लागली*
*सदर घटनास्थळी मु्तक मनोज कसा पोहचला,त्यांनी गळफास केव्हा लावला,गळफास लावन्याचे कारण काय,सदर घटना ही घातपातातून तर घडली नाही ना या दिशेने पोलीस निरीक्षक अशोक कोळी व त्यांचे सहकारी अधिकारी तपास करत असून वरिल प्रश्नांची उत्तरे शवविच्छेदन अहवाल व तपासातून निश्पन्नास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …