*कोरोनाचा ग्रामीण भागात शिरकाव*
*सावनेर पाठोपाठ कळमेश्वर तालुक्यातील सोनोली गावात कोरोना रुग्ण*
*या साखळीतील 8 हाय रिस्क रुग्ण मेडिकल नागपूर तर 11 रुग्णांना होम कोरंटाईन*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
सावनेर – नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूने शिरकाव केला असून सावनेर तालुक्यातील दहेगाव पाठोपाठ कळमेश्वर तालुक्यातील सोनोली या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.*
*तालुक्यातील सोनोली 300 लोकसंख्या असलेले छोटे गाव आहे या गावातील सदर तरुण रुग्ण हा सावनेर (वाघोडा) येथील रहिवासी जावई सह 15 दिवसा अगोदर चारचाकी गाडीने दोन विद्यार्थी यांना नाशिक येथे सोडायला गेला व परत येताना त्याने मुंबई येथील लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांना नागपूर येथे चारचाकी गाडीने आणले व त्यांना सोडून तो सरळ आपल्या गावी सोनोली येथे आला काही दिवस त्याला प्रकृती ठीक लागत नसल्याने त्याने घरीच आराम केला. आजार बरा होत नसल्याने त्याने तो त्याचा मित्रांसोबत तेलकामठी केंद्रात तपासणी केली व नंतर सावनेर येथे औषधोपचार करून व तो परत सोनोली राहत्या घरी आला.*
*गावात मुंबईवरून सदर व्यक्ती आल्याने गावातील ग्राम पंचायत कर्मचारी व कल्पना आशा वर्कर यांना दिली आशावर्कर यांनी चाचणी करून प्राथमिक आरोग्य केंद्र तिष्टी येथे सदर रुग्णा बद्दल माहिती दिली प्राथमिक आरोग्य केंद्र,तिष्टी येथील डॉक्टर यांनी त्यात असलेली लक्षणे बघता त्याला नागपूर येथे कॉरंटाइन करण्यात आले त्याची चाचणी केली असता तो रुग्ण दिं 27 मे रोजी आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह निघाला.*
*सोनोली या गावात कोरूना रुग्ण आढळल्याने नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला,कळमेश्वर तहसीलदार सचिन यादव,पोलीस उपविभागीय अधिकारी संभलकर,सावनेर पोलिस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी,वैधकीय अधिकारी,मंडळ अधिकारी श्रीमती निमजे , तलाठी,सचिव गावात दाखल झाले व सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात असून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती बद्दल माहिती घेत असून सोनोली गाव हे ये जा करण्यासाठी बंद(सील) करण्यात आले आहे.*
*तर सदर रुग्ण व त्याचे वाघोडा निवासी जवाई हे मुंबई वरूण परत आल्यावर सावनेर शहर लागतच असलेल्या वाघोडा येथेही जवायाच्या घरी काही दिवस वास्तव्यास असल्याने सदर प्रभागातील 19 लोकांन पैकी 8 हाय रिस्क रुग्णांना मेडिकल हाँस्पिटल नागपूर येथे तर उर्वरित 11 संबंधित रुग्णांना तपासणी करून होम कोरंटाईन करण्यात आले आहे.सदर माहीती मुख्याधिकारी रविन्द्र भेलावे व प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे वरिष्ठ चिकित्सक डॉ भुषन सेंबेकर यांनी दीली असुन तहसीलदार दिपक कारंडे,मुख्याधिकारी न.प.सावनेर,पोलीस निरीक्षक अशोक कोळी,वरिष्ठ चिकित्सक डॉ भुषन सेंबेकर यांनी नागरिकांना कोणत्याही अफवाऐ लक्ष न देता आपल्या परिसरात बाहेरून आलेल्यांची सुचना स्थानिक प्रशासनास देऊण सहकार्य करावे अशी विनंती केली आहे*