*कोरोना ब्रेकिंग*
*सावनेर तालुक्यात दोन रुग्ण मिळाल्याने खळबळ*
*तालुक्यात दहेगाव नंतर आजनी व जटामखोरा बनले हाँटस्पाँट*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*संपूर्ण विश्वाला हादरून सोडणार्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आता शहरीभागातून ग्रामीण भागात ही झपाट्याने पसरु लागला आहे तरीही सामन्य नागरिक आजही या विषाणूला अगदी हलक्यात घेत असल्याचे निदर्शनास येत आहे*
*नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका हाँटस्पाँट बनणार काय…?*
*मिळालेल्या आधिकारीक माहीतीनुसार आज तालुक्यात दोन कोरोना पाँजेटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली असुन ग्रामीण भागात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून कठोर पाऊले उचलण्याची नितांत गरजेच आहे अन्यथा स्थीती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत आहे*
*आज सकाळी प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कोवीड़ 19 चे प्रभारी चिकित्सक डॉ भुषण सेंबेकर यांनी दिलेल्या अधिकारीक माहीती नुसार सावनेर तालुक्यातील सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सावनेर शहराच्या लागत अवघ्या तीन की.मी अंतरावर असलेल्या आजनी येथील एक,तसेच केळवद पोलीस स्टेशन हद्दीतील जटामखोरा येथील एक असे दोन रुग्णांचा कोरोना टेस्ट रीपोर्ट पाँजेटिव्ह आल्याची खात्रीलायक माहीती मीळताच प्रशासन हरकतीत येऊण सदर गावांना “हाँटस्पाँट”घोषित करुण गाव बंदी,तसेच संपूर्ण गाव सेनिटाईझ व आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध कार्याला वेग आला आहे सदर दोन रुग्ण व दहेगाव येथील एक असे मिळून सावनेर तालुक्यातील रुग्णांची संख्या आता तीन वर पोहचली आहे*
*काय आहे मिळालेल्या रुग्णांची हिस्ट्री*
*डाँ.भुषण सेंबेकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार आजनी येथे आढळलेला रुग्ण 26 मे च्या जवळपास चेन्नई मद्रास येथून आल्याची माहिती असुन सदर रुग्णांची प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे तपासणी करुण त्यास आजनी येथील शाळेत कोरंटाईन करण्यात आले होते तेथून दोन दिवस आधी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यास आमदार निवास नागपूर येथे त्याला कोरंटाईन करण्यात आले असुन तेथेच त्याची कोरोना टेस्ट केली असता आज सकाळच्या दरम्यान त्याचा रिपोर्ट पाँजेटिव्ह आला असुन त्यावर उपचार सुरु आहे*
*तर जटामखोरा येथे आढळलेला दुसरा रुग्ण हा त्याच्याच संपर्कातील असल्यची माहीती असुन त्याच बरोबर अजून दोन म्हणजेच आजनी एक जटामखोरा तीन असे चार लोकांनी चेन्नई ते सावनेर असा प्रवास केल्याची माहीती उघडकीस येत आहे*
*घाबरण्याचे कारण नाही, नियमांचे पालन करा,कोरोना दुर सारा*
वरिष्ठ चिकित्सक डॉ भुषण सेंबेकर
*प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कोवीड़ 19 चे प्रभारी चिकित्सक डॉ भुषण सेंबेकर यांनी आमच्या स्थानिक प्रतिनिधी व प्रसार माध्यमातून तालुक्यातील सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची भीती न बळगता प्रशासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करण्याची विनंती करित आश्वासीत कले आहे की प्रशासकीय संपूर्ण यंत्रणा यख संसर्गजन्य कोरोना विषाणूंचा नायनाट करण्याकरिता युध्द पातळीवर कार्य करत असुन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज आहे.फक्त नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये,गर्दीचे ठीकाण टाळावे, वांरवार हात स्वच्छ धुने,तोंडावर मास्क लावने,सोशल डिस्टंसींग पाळणे हेच कोरोना विषाणू पासुन आपले व आपल्या परिवाराच्या संरक्षण करणे हाच सध्यातरी कोरोना विषाणू पासून बचाव करण्याचा सोपा मार्ग व औषधी आहे असे स्पष्ट मत व्यक्त करीत वरिल उपाययोजना करुण सर्वंनी स्वताचे संरक्षण करुण सहकार्य करावे अशी विनंती केली आहे*
*जटामखोरा सील करून शासनाने दिलेल्या सर्व उपाययोजनांचे काटेकोर पणे पालन करू*-
सोनू राव साहेब उप सरपंच जटामखोरा
*आज सकाळी आढळलेल्या रुग्णाचा संबंध ग्राम पंचायत जटामखोरा ही असुन आज सकाळच्या दरम्यान सदर रुग्ण कोरोना पाँजेटिव्ह आढळल्याची माहिती प्राप्त होताच सर्वप्रथम सरपंच व ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्राम सचिवांना तात्काळ माहिती देऊण आढळलेल्या रुग्णांच्या परिसरासह संपूर्ण गावाला कठडे लावून सुरक्षीत करणे, गावातील संपूर्ण परिसरात फवारणी करणे,रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या ओळखी पटवून त्यांना तपासणी व उपचारासाठी रवाना करणे,गावातील प्रत्येक घरा घरातील नागरिकांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकार्य करणे तसेच शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्यासाठी प्रवु्त्त करणे आदी प्राथमिक कार्यास सुरुवात केली असल्याची माहीती प्राप्त होत आहे*
*महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या वतीने आपण सर्वांना विनंती करण्यात येते की आपण शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करुण स्वताला व परिवारास सुरक्षित ठेवा.कारण की कटू प्रसंग ओढावल्यावर काळजी घेतली तरी त्यांची मोठी किंमत आपणास मोजावी लागणार*
*करिता घरीच रहा व स्थानिक प्रशासनाच्या दिशानिर्देशांवर डोळेझाक न करता त्यावर अमल करा हीच आग्रहाची विनंती*