*कर्तव्यावरूण घरी परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा काळाचा घाला* *अज्ञात वाहनाच्या धडकेत कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचा मु्त्य* *केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत परसोडी शिवारातील घटना*

*कर्तव्यावरूण घरी परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा काळाचा घाला*

*अज्ञात वाहनाच्या धडकेत कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचा मु्त्य*

*केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत परसोडी शिवारातील घटना*


*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः तालुक्यातील केळवद पोलीस स्टेशन मधे कर्तव्यावर असलेले रवींद्र शेंडे वर 37 रा.पीपळा डागबंगला या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकी वाहनास अज्ञात वाहनाने घडक दिल्याने त्यांचा जागीच अंत झाल्याची दुर्दैवी घटनेने सर्वाना हेलावून टाकले*


*मिळालेल्या माहीतीनुसार मु्तक पोलीस कर्मी रविंन्द्र शेंडे हे आज केळवद पोलीस स्टेशन मधे स्टेशन डायरी अमलदार म्हणून कर्तव्यावर होते सायंकाळी 8-00 वाजता त्यांनी आपली ड्यूटी संपवून आपल्या MH BQ 4659 क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने आपल्या घरी परतत असतांना परसोडी शिवारात काळाने झाप घातली व अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक देऊण पळून गेला सदर घटनेची माहिती केळवद पोलीसांना मीळताच घटनास्थळी धाव घेतली असता मु्तक अजुन कुणी नसून काही वेळा आधी आपणा सर्वांशी बोलून निघणारा आपलाच कर्मचारी असल्याचे निदर्शनास येताच तातडीने प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे पाठविण्यात आले परंतु तोवर रवींद्र शेंडे यांची प्राणज्योत मावळली होती*


*काही वेळा आधीपर्यंत आपल्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्व कर्मचारी अधिकारी यांच्यात शोककळा पसरुन हळहळ होऊ लागली*


*मु्तक रवींद्र शेंडे हे कर्तव्यदक्ष कर्मचारी असुन मनमिळाऊ स्वभावाचे धनी आपल्या परिवारातील आधारस्तंभ होते त्यांच्या मागे त्यांना दोन मुली पत्नी आई वडीलासह मोठा आप्त परिवार असल्याची माहीती असुन सदर घटनेची पोलीस स्टेशन केळवद येथे आज्ञात वाहन चालका विरूद्ध आकस्मिक अपघाताची नोंद करुण पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असुन अज्ञात वाहनाचा शोध घेतल्या जात आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …