माजी सरपंच सुरेश वानखेडे यांच्या पुढाकाराने ८४ कुटुबियांना मदतीचा हात
विशेष तालुका प्रतिनिधि
खापरखेडा : दहेगाव रंगारी येथे मागील आठवड्यात कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने कन्टोनमेंट क्षेत्र घोषित करून प्रशासनाने 22 लोकांना कोरोनटाईन करिता नागपुर येथील आमदार निवास येथे पाठवले होते. रेड झोन मधील लॉक डाऊन परिस्थिती असल्यामुळे ८४ कुटुंबाची उपवास मारीची वेळ आली असता स्थानिक ग्रामपंचायत प्रशासना ८४ कुटुंबावर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दहेगाव चे माजी सरपंच सुरेश वानखेडे यांनी केला. सुरेश वानखेडे यांनी पुढाकार घेत रोजंदारी करून पोटाचीभुक मिटणाऱ्या परिवारांची दखल घेतली व २९ मे रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन राठी यांनी नागपुर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रल्हाद अग्रवाल यांच्या जॉइंट एक्शन कमिटी च्या माध्यमातुन या गरीब परिवारांची मदत करण्याची विनंती केली. लगेच दुसऱ्या दिवशी ८४ परिवारा करिता एक महिन्याचा किराणा सामग्री प्रत्येकी एक अशा ८४ कीट चे दहेगाव रंगारी येथे वाटप केले तसेच या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष विजयबाबु देशमुख, रमेश जैन , राधाकृष्ण मित्तल, माजी सरपंच सुरेश वानखेडे, नामदेव चौधरी, अरुण सिंग, किशोर मुसळे, ग्रामपंचायत सदस्य सपना वानखेडे, सुनील भोयर , माजी सभापती चंद्रशेखर पातावने, आशिष फुटाने देवराव रामेकर आदि यावेळी सोशल डीस्टन्स चे पालन करून उपस्थित होते.