दहेगाव रंगारी लवकरच होणार कोरोना मुक्त

दहेगाव रंगारी लवकरच होणार कोरोना मुक्त

विशेष तालुका प्रतिनिधि

खापरखेडा : सावनेर तालुक्यातील दहेगाव रंगारी येथे मुंबई वरून आलेला २८ वर्षीय युवक कोरोना रुग्ण आढळला होता या रुग्णाची दाखल घेत प्रशासन खळबळी जागे झाले त्या युवकाच्या संपर्कात आलेल्या २२ लोकांना आमदार निवास येथे कोरोनटाईन करण्यात आले व त्यांचा कोरोना टेस्ट आव्हाल निगेटिव आला आहे. कोरोना रुग्ण दहेगाव रंगारी येथे आढळताच गावाला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे ,पोलीस अधीक्षक राकेश ओला आदी अधिकार्यांनी पाहणी करून कँटोन्मेंट क्षेत्र म्हणून दहेगाव रंगारी सील केले. या वेळी दहेगाव रंगारी गावात कोरोना विरुद्ध लढ्यात शासन पुर्णताकतीसह उभे राहिले. उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार दीपक करंडे, उपविभागीय अधिकारी पुज्जलवार , गटविकास अधिकारी अनिल नागणे, खापरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी वाघ ,सरपंच प्रकाश गजभिये, ग्राम विकास अधिकारी पद्माकर बाळापुरे व परिसरातील जनप्रतिनिधी यांनी पुढाकार घेत येऊन रेड झोन सीमा ग्रामपंचायतीकडून सिल केल्यात रेड झोन परिसरातील कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य किराणा, भाजीपाला , औषधी , गॅस सिलेंडर, आदी साहित्य मागणीनुसार वस्तू पुरविण्यात येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणसावंगी यांच्यामार्फत गावाला वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे शाशानाने व ग्राम पंचायत प्रशासनाने दाखल घेतल्या बद्दल लवकरच दहेगाव रंगारी पुर्ण गाव कोरोना मुक्त होणार आहे बद्दल ग्रामस्थ दहेगाव ग्रामपंचायात सरपंच प्रकाश गजभिये, राजकारण नकरता , ग्रामसेवक कर्मचारी यांनी योग्य प्रकारे कोरोना परिस्थिती हाताळत आहेत. दहेगाव येथे सापडलेले कोरोना रुग्ण रुग्णालयात झपाट्याने बरा होत आहे अशी माहिती सरपंच प्रकाश गजभिये यांनी दिली बद्दल ग्रामपचायत प्रशासनावर शुभेछाचा वर्षाव होत आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …