*सिरोंचात कोरोनाचा शिरकाव, एकूण एक्टिव रुग्ण २७*
गडचिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुडकर
गडचिरोली: आज आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात १ नव्या कोरोना पॉझिटीव रुग्णाची भर पडली आहे. नवा रुग्ण सिरोंचा तालुक्यातील असून, तो हैदराबादहून आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित अॅक्टीव रुग्णांची संख्या २७ एवढी झाली आहे.
आज सकाळी प्राप्त अहवालानुसार, सिरोंचा तालुक्यात एक रुग्ण कोरोना पॉझिटीव आढळून आला. तो ह्दयविकाराच्या उपचारासाठी हैदराबादला गेला होता. तेथे दवाखान्यात त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. यापूर्वी तो चंद्रपूरलाही गेला होता, अशी माहिती आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना पॉझिटीव रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. त्यातील पहिले पाच रुग्ण २८ मे रोजी, तर तीन रुग्ण ३० मे रोजी कोरोनामुक्त झाल्याने आता विलगीकरणात असलेल्या एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २७ असून, त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
*गडचिरोली तालुक्यात २ रुग्णांची भर, तर तिघे जण झाले कोरोनामुक्त*
आज आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात २ नव्या कोरोना पॉझिटीव रुग्णाची भर पडली आहे. नवे रुग्ण गडचिरोली तालुक्यातील असून, ते गुजरातहून आले आहेत. दुसरीकडे, तीन कोरोना विषाणूबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
प्राप्त अहवालानुसार, गडचिरोली तालुक्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव आढळून आले. हे रुग्ण गुजरातमधून आले असून, त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव आला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना पॉझिटीव रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. त्यातील पहिले पाच रुग्ण २८ मे रोजी, तर तीन रुग्ण आज कोरोना मुक्त झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना त्यांच्या स्वगावी रवाना करण्यात आले. त्यामुळे आता विलगीकरणात असलेल्या एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 27 असून, त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.