*चंद्रपूर जिल्हातील बाधीताचीसंख्या पोहचली २७ वर*

*चंद्रपूर जिल्हातील बाधीताचीसंख्या पोहचली २७ वर*

चंद्रपुर प्रतिनिधि -मूजम्मिल शेख
चंद्रपूरमहानगरातील भिवापुर वॉर्ड परिसरातील एक ६२ वर्षीय व्यक्ती शुक्रवार दिनांक ५ जून रोजी कोरोना बाधित आढळले.जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार काल चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात सारीचे रुग्ण म्हणून अती दक्षता कक्षात दाखल बाधीताच्या स्वॅबचा अहवाल आज ५ जून रोजी पॉझिटीव्ह आला.
त्यांना गेल्या काही दिवसांपासून ताप व खोकला होता. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते काल ४ जून रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव आला आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत २७ झाले आहेत.आतापर्यत २२ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २७ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता ५ आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …