*ब्रेकिंग न्यूज*
*युवकाची मीत्रांनी हत्या करुण शव विहिरीत फेकले*
*केळवद पोलीस स्टेशन हद्दीतील नांदोरी शिवारातील घटना*
*दगडाने ठेचून केली हत्या,आरोपी फरार*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर*
*सावनेरः तालुक्यातील केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नांदोरी शिवारात दुपारी 1-30 च्या दरम्यान आपसी वादात दोन मीत्रांनी मीळून एका मित्राची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करून प्रेत नजिकच्या विहिरीत फेकल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच केळवद पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेश मट्टामी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊण विहरित पडलेल्या शवास बाहेर काढून घटनास्थळ पंचनामा करुण शव उत्तरीय तपासणी ला रवाना केले*
*मिळालेल्या माहीतीनुसार आरोपी विक्की बाबा धराडे वय 32 व सतिष पाडुरंग ताजने वय 45 व एक मीत्र तसेच मु्तक राजु मुरलीधर जोगी वय 33 सर्व राहणार नांदोरी हे चौघे मीत्र असुन त्यातील आरोपी विक्की याची पार्श्वभूमीवर ही संशयास्पद असुन काही दिवसांपूर्वी पासून तो नांदोरी येथे आई वडीलांजवळ राहत असुन आई वडीलासह गावतही इतरांना त्रास देत होता त्याविरुद्ध अनेक तक्रारीची ही नोद असल्याची माहिती निघून येत आहे.त्याला मदिरापाणाचा छंद व त्याचा स्वभाव तापट असल्याने नेहमीच या ना त्या कारणावरून आई वडील व गावकर्यांशी त्याचे खटके उडायचे*
*आज दि.6 जुन रोजी दुपारी चौघांना सोबत बघितल्याची माहीती असुन 1-30 च्या दरम्यान गावालागतच्या विहरीजवळ प्रत्यक्षदर्शीस कोणीतरी विहिरीत टाकत असल्याचे निदर्शनास येताच सदर घटनेची माहीती शेत मालक व पोलीस पाटिल नरेंद्र दातारकर यांना देण्यात आली व घटनास्थळी जाऊण बघितले असता सदर शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीत मुतकाचे शव तसेच विहिरी काठी रक्ताने माखलेला दगड़ आढळून आला तोवर केळवद पोलीसांनी घटनास्थळ गाठले व मुतकाचे शव विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी सावनेर येथे रवाना करण्यात आले*
*घटनेनंतर घटनेतील तीनही आरोपी पसार झाले असुन केळवद पो.स्टे चे ठाणेदार सुरेश मट्टामी व त्याचे सहकारी पुढील तपास करीत आहेत*