*सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्यावर कारवाई*
*नगर परिषद व पोलीस विभागाची मोठी कार्रवाई*
रामटेक प्रतिनिधि- ललित कनोजे
रामटेक– कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशात व राज्यात संपुर्ण लाॅकडाऊन करण्यात अाले.या संपुर्ण लाॅकडाऊन काळात तळीरामांची चांगली फजिती झाली होती.तब्बल दोन महीण्याच्या काळानंतर शासनाने वाईन शाॅप , देशी दारु विक्रीचे परवानाधारक दुकाने सुरु करण्यात अाले. पण या दारु विक्री दुकानातुन फक्त पार्सल सुविधा देण्यात येतो. त्यामुळे अाता दारू शौकीन यांना दारू प्यायची कुठे प्रश्र पडला.
पण रामटेक शहरातील नगरपरिषद सुपर मार्केट येथील बंद असलेल्या गाळ्यांच्या लाईन मध्ये तळीरामांनी सार्वजनिक ठिकाणी दिवसभर मद्यप्राशन करण्याचा अड्डा बनविला त्यामुळे त्यांच्या गाळ्या समोरील दुकानदार वत्या ठिकाणावरुन जानारे लोकांना ञास होत होता.याबाबत नगर परिषद व पोलीस विभागाला माहीती मिळताच सावर्जनिक ठिकाणी मद्यप्राशन करणांऱ्या तळीरामांवर नगरपरिषद व पोलीस स्टेशन मार्फत संयुक्त कारवाई करत दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांचे मार्गदर्शनात कारवाई करण्यात अाली.