*वाहनाची झाडाला धडक; एका इसमाचा जागीच मृत्यू ,तर एक जखमी*
*बावनबीर रस्त्यावरील घटना*
विशेष प्रतिनिधि बुलढाणा
बुलडाणा – जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील टूनकी – बावनबीर रस्त्यावरील भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी वाहनाने धडक दिल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 8 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली.
माहितीनुसार , वरवट बकाल ते टूनकीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी वाहनाने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना टूनकी बावनबीर मार्गावर घडली. मोहन वानखडे रा. टूनकी असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.तर गणेश बोडखे रा.जामोद हइ जखमी आहेत. दुचाकी क्र जी जे 18 एल 9431 क्रमांकाचे वाहनाने वरवट बकालवरून टूनकीकडे जात होते. दरम्यान बावनबीर नजीकच्या वळणावर या वाहनाने झाडाला जबर धडक दिली. नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. या दुचाकी वाहनाचा समोरील भाग पूर्णत: क्षतीग्रस्त झाला. त्यानंतर घटनास्थळावर सोनाळा पोलिस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले व त्यांनी रुग्णवाहिका बोलाविली. दोन्ही इसमाला सामान्य रुग्णालयात वरवट बकाल येथे पाठविण्यात आले.