*अरविंद बन्सोड हत्याकांड*
*आरोपींवर अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल*
नरखेड प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे
*नरखेड ःऑल इंडिया पँथर सेने सहित चित बहुजन आघाडी सर्वच रिपाई पक्ष-संघटनांनी आता जलालखेडा पोलीस स्टेशन येते 302 हत्येचा गुन्हा दाखल करण्याचा सुद्धा आग्रह धरला आहे. डीवायएसपीने तपास करून गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिलेले आहे.*
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेने दाबलेल्या या प्रकरणाला वाचा फोडून अरविंदच्या न्यायाचा लढा तीव्र केलाआहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदार संघातील हे प्रकरण सत्तेच्या बळावर दाबून टाकलं होते*
*या विरोधात ऑल इंडिया पँथर सेनेच्या ऑनलाइन आंदोलनाच्या दणक्यातून, सोशल मीडियातील आधुनिक जनआंदोलनातून, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीतून व व्यापक संघर्षातून अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन आंबेडकरी आंदोलनाचे हे यश आहे,*
*सदर लढाई अद्यापही संपलेली नसून हत्येत सक्षभागी आरोपीवर 302 कलमान्वये गुन्ह्याची नोंद व व आरोपींवर कठोर कार्यवाही झाल्याशिवाय आणि अरविंद बन्सोडला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत असाही इशारा याप्रसंगी देण्यात आला*
*अरविंद बन्सोड हा चळवळीसाठी शहीद झाला आहे त्याच हे बलिदान आहे.गोरगरिबांच्या हिताचं काम करत असतांना तो शहिद झाला आहे.ऑल इंडिया इंडिया पँथर सेनेच्या नरखेड तालुक्यातील पदाधिकारी व महाराष्ट्रातील तमाम हजारो कार्यकर्त्यांनी ऑनलाइन आंदोलन यशस्वी केलं आणि अरविंदला न्याय मिळवण्यासाठी लढा उभा करून, या बहिऱ्या व्यवस्थेला खडबडून जागे *करण्याचं काम केल्याचे मनोगत दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष आँल इंडिया दलित पँथर सेना यांनी व्यक्त करित जोवर अरविंद बन्सोड ला न्याय मिळणार नाही तोवर लढा सुरूच राहील असे ठाम मत व्यक्त केले*