कुहीत मासेविक्रेता व नगरपंचायत अधिकाऱ्यांमध्ये वाद
मासे विक्रेत्यां विरोधात नगरपंचायत ने दिली पोलीस ठाण्यात तक्रार
विशेष प्रतिनिधि- निखिल खराबे
कुही:- कुही नगरपंचायत ने कोरोना काळात गावाबाहेर बाजार समितीच्या पटांगणात स्थलांतरित केलेला गुजरी बाजार 6 जून ला बाजार चौकात पुन्हा परत आणल्यानंतर गावाबाहेर जागा ठरवून दिलेले मच्छीविक्रेते आपली दुकाने घेऊन बाजार चौकातील बाजारात मासे विक्रीकरिता बसल्यांनातर नगरपंचायत चे अधिकारी व कर्मचारी बाजार चौकात पोहचले व त्यांनी त्यांना नेमून दिलेल्या गावाबाहेरील जागेवर परतण्यास सांगितले पण मच्छीविक्रेते ऐकण्यास तयार नव्हते तेव्हा मासेविक्रेता व कर्मचारी यांच्यात बराच वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. तेव्हा लोकांचा जमाव वाढत असल्याचे पाहून नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावरून निघून गेले व त्यानंतर त्यांनी मासेविक्रेता यांचायविरोधात तक्रार दिल्याची माहिती मिळाली असून कुणा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली याची माहिती मिळू शकली नाही.
सदर प्रकरण गावात वेळगेच वळण घेईल असे चित्र दिसून येत असून नगरपंचायत प्रशासनाने सर्व नगरसेवक यांना विश्वासात घेऊन मासेविक्रेता यांच्यासाठी जागा नेमून देण्याची चर्चा करायला हवी होती अशी चर्चा शहरात असून नगरपंचायत पुढे कोणते पाऊल उचलते व मासेविक्रेता जागा बदलण्यास तयार होतात काय हे बघण्याचा विषय आहे.