*झाड कोसळल्याने इसमाचा मु्त्यू*
*पाटबंधारे उप विभाग कार्यालय परिसरातील घटना*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर सावनेर*
*सावनेरः आज दि.10 जुन ला दुपारी 3-30 च्या दरम्यान अचानक सुरु झालेल्या वादळी वार्यामुळे पटबंधारे उपविभाग कार्यालय सावनेर परिसरात असलेले “महारुख” प्रजातीच्या जवळपास चाळीस पन्नास फुट उंचीचे झाड मुळापासून कोसळल्याने सदर झाडाखाली पाटबंधारे विभागात आपल्या कामाला आलेले धनराज देवलकर वय 67 रा.नांदा गोमुख यांच्या डोक्यावर पडल्याने ते जागीच रक्ताच्या थोळक्यात लोळून गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली व पोलीस निरिक्षक अशोक कोळी,नायब तहसिलदार जयसिंग राठोड, तलाठी मोरे,प्राथमिक आरोग्य केन्द्राचे डॉ. भुषन सेंबेकर, मरावीम चे उप अभियंता सातपुते,नगर परिषद सावनेर चे कर्मचारी सह समाजसेवी रामराव मोवाडे,सोनु रावसाहेब,सतिश लेकुरवाळे,माजी नगरसेवक सुजीत बागडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊण तात्काळ उपाययोजना व घटनास्थळ पंचनामा करुण मु्तक धनराज देऊळकर यांचे पार्थिव उत्तरीय तपासणी करीता रवाना केले*
*मिळालेल्या माहीतीनुसार मुतक धनराज देऊळकर रा. नांदा गोमुख, वय 67 व त्यांचा मुलागा योगेश्वर देऊळकर वय 30 हे दोघे तहसील कार्यालयात काही खाजगी कार्याकरिता आले असुन तहसील कार्यालय लागत असलेल्या झेरॉक्स वरुन आपले काम आटपून पुढील कार्याकरिता पाटबंधारे विभागाकडे जात असतांनाच कार्यालय परिसरात पोहचताच अचानक जोराची वादळी वारे वाहताच अचानक महारुख चे झाड कोसळल्याने धनराज हे जागीच गतप्राण झाले*
*मु्तक धनराज देऊळकर के गोमुख विद्यालय नांदा गोमुख येथे बाबू पदावरून सेवानिवृत्त असुन त्यांचे मागे पत्नी दोन मुलं व दोन मुली असा आप्त परिवार असुन बाप लेक सोबत चालत असताच क्षणातच आपल्या जन्मदात्याला काळाने हिरावून घेतल्याचे हु्दयविकारक दु्ष्य मुला पुढे अचानक घडल्याने मुलगा एकच निशब्द होऊन घटनेची सुचना मीळताच देऊळकर आप्त परिवारा सह नांदा गोमुख परिसरात एकच शोककळा पसरली*
*आकस्मिक घडलेल्या या प्रकारात मु्तक धनराज यांचे निधनानंतर त्यांचे परिवाराचे काय…?
त्यांचे आकस्मिक मु्त्यूस जबाबदार कोण,तसेच पाटबंधारे परिसरात असलेले जुने झाडे झुडप्यांची मानसुनपूर्व नियोजन न केल्यामुळे सदर प्रकार घडल्याचे बोलल्या जात असुन इतकी मोठी अप्रिय घटना आपल्या कार्यालयीन परिसरात घटीत होउण सुध्दा पाटबंधारे विभाग सावनेर चे उप अभियंता नरेन्द्र निमजे हे अनुपस्थित असुन त्यासंदर्भात विचारना केली असता साहेब दौर्यावर असल्याची माहीती वरिष्ठ लिपीक एस.आर.जिवनापुरकर यांनी दिली.नैसर्गिक आपत्ती चे नाव देऊण मुतकाच्या परिवारास शासकीय आर्थिक मदत मीळवून देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाने स्वीकारावी अशी मागणी उपस्थित नागरिकांतुन होत आहे*
*सदर घटनेची आकास्मीक नोद घेऊण पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे*