*सूरक्षित जीवनासाठी तोंडाला मास्क बांधणे आवश्यक –डॉ.गिरीष काटकर*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
कोराडी – तायवाडे महाविद्यालय महादूला -कोराडी येथे गु्हअर्थशास्त्र विभागातर्फे डॅा.माया शिरखेडकर यांनी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमूखांना मास्कचे वाटप केले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील नॅक समन्वयक डॉ.गिरीष काटकर उपस्थित हाेते, याप्रसंगी डॉ.गिरीष काटकर यांनी आज जगातील परिस्थितीची जाणीव करून दिली व आपले जीवन सूरक्षित ठेवण्यासाठी व समाजाला सूरक्षितता प्रदान करण्यासाठी मास्क चा वापर, सामाजिक सूरक्षित अंतर तसेच वेळोवेळी साबनाने हात स्वच्छ करणे व सेनिटायझरचा वापर आवश्यक आहे ,हे पटवून दिले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वकील शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.विजय चरडे यांनी केले, यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.