*चनकापूर वसाहतीतील युवती निघाली कोरोना पाॅजिटिव्ह* *दिल्लीवरुन आली होती प्रवास करुन*

*चनकापूर वसाहतीतील युवती निघाली कोरोना पाॅजिटिव्ह*


*दिल्लीवरुन आली होती प्रवास करुन*

खापरखेडा विशेष प्रतिनिधि

खापरखेड़ा–  परिसरातील वेकोलिच्या चनकापूर वसाहतीत राहणा-या एका २५ वर्षीय युवतीला कोरोना पाॅजिटिव्ह असल्याची रिपोर्ट आज(शनिवारी) प्राप्त झाल्याची माहिती समोर आल्याने वेकोली वसाहतीत एकच तारांबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना पाॅजिटिव्ह रुग्ण ८जून रोजी दिल्लीवरून चनकापूर येथे घरी आली .तिला बाळकफ असल्याने नेहमीसारखा त्रास होवू लागला.नेमके म्हणजे ती दिल्ली नौकरी करीत होती. दिल्लीवरुन चनकापुरला आल्यावर ती स्वत: होम क्वारंटाईन असल्याची चर्चा असून तिच्या पाल्यांनी स्थानिक आरोग्य प्रशासनाला दिल्लीवरून प्रवास केल्याची माहिती सुद्धा दिली नव्हती अशी माहिती विश्र्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आली. तिचे वडिल वेकोलित अधिकारी पदावर असल्याने परिवार वेकोलि वसाहतीत राहतात .शुक्रवारी तिला सर्दी ताप खोकल्याचा त्रास असल्याने शुक्रवारीच सायंकाळी वलनी वेकोलि रुग्णालयात तिच्या पाल्यांनी स्कुटीने नेले.तेथील डाॅक्टरांनी तिचे लक्षणे पाहिले असता नागपूर येथे उपचारासाठी जाण्याचे सांगितले.लागलीच वलनी दवाखान्यातील कोव्हिड-१९ रुग्ण वाहिकेने शासकीय इंदिरा गांधी रुग्णालय व महाविद्यालय नागपूर येथे हलविण्यात आले.तिचे स्वॅब कोव्हिड-१९ चाचणी करीता घेण्यात आले .आज (शनिवारी) पाजिटिव्ह असल्याची रिपोर्ट आली असून तिच्या संपर्कात येणाऱ्या परिवारातील सदस्यांसह इतर लोकांना क्वारंटाईन करणार असल्याची माहिती असून बातमी लिहोस्तर क्वारंटाईन करण्यात आले नव्हते.संबधित चनकापूर वसाहतीत परिसर सिल करण्यात आला असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वलनी रुग्णालयात वलनी ग्राम पंचायतीने शुक्रवारी रात्री व आज सकाळी सुद्धा दोन वेळा सेनेट्राईज करण्यात आले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …