*MSEB मधील कंत्राटी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन* *महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ*

*MSEB मधील कंत्राटी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन*

*महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

संपुर्ण जगाला कोरोना संकटाने घेरले असताना MSEB च्या महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील हजारो वीज कंत्राटी कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ऊन वारा पाऊस निसर्ग चक्रीवादळात देखील महाराष्ट्रातील जनतेला अहोरात्र अखंडीत वीज पुरवठा देण्याकरिता आपले जीव धोक्यात घालून काम केले. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात वीज वाहिन्यांवर काम करताना एकूण 8 कंत्राटी कामगार मृत पावले तर 12 कामगार गंभीर जखमी झाले.

राज्यात अनेक ठिकाणी कधीच वेळेवर वेतन मिळत नाही, वेतनातील फरक व दिवाळी बोनस पूर्ण मिळत नाही, सॅनिटायझर साठी मंजूर 1000 रुपये अजून अनेकांना मिळाले नाही. उलट कामगारांच्या कडूनच कंत्राटदार हे पगारातून हजारो रुपये अनधिकृतरित्या काढून घेतात या बाबत तक्रार देणाऱ्या कामगारांना कमी केले जाते,यांना मेडिकल स्कीम अथवा विमा सेवा नाही, काम करताना मृत झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत नाही, अपघात झाल्यास कंपनी कडून मदतीची तरतूद नाही.असे प्रतिपादन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ( संलग्न भारतीय मजदूर संघ)संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी केले.

औरंगाबाद येथे रेल्वे अपघातात मेलेल्या 16 परप्रांतीय कामगारांना शासनाने प्रत्येकी 5 लाख रुपये तातडीने दिले मात्र कोरोना काळात जनतेला अहोरात्र वीज सेवा सुरळीत देताना मरण पावलेल्या 8 महाराष्ट्रातील कामगारांच्या तोंडाला मात्र या शासनाने पाने पुसुली हे आमचे दुर्दैव नाही तर काय आहे.

या सर्व समस्या सोडवण्याच्या दृष्टीने संघटनेने महाराष्ट्र शासन, वीज कंपनी प्रशासन यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार केले मात्र अद्याप शासन व प्रशासन झोपेतून जागे झाले नाही, कोविड विमा नाही, की अद्याप या वीज कामगारांना साधे कोविड योद्धा देखील संबोधले नाही, संघटनेच्या पत्रांना प्रती उत्तर नाही यामुळे कर्तव्य बजावून सुध्दा जर न्याय व हक्कासाठी कामगारांना रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ येत असेल तर याला जबाबदार कोण

या पार्श्वभूमीच्या निषेधार्थ शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटना एकूण 4 टप्यात आंदोलन करणार असून

पहिल्या टप्यात सोमवार दिनांक 15 जून 2020 रोजी कामगार काळ्या फिती लावून काम करतील, संघटनेचे पदाधिकारी नोटीसीची प्रत कंपनीच्या सर्व स्थानिक कार्यालयातील अधिकाऱ्यांना देऊन निषेध नोंदवतील.

दुसऱ्या टप्यात गुरुवार दिनांक 25 जून 2020 रोजी संघटनेचे पदाधिकारी निषेधाचे बोर्ड हातात घेऊन PF ऑफिस, ESI ऑफिस, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, तहसीलदार ऑफिस , जिल्हाधिकारी कार्यालय यांना नोटीसीची प्रत देऊन तेथे निदर्शने करतील.

तिसऱ्या टप्यात बुधवार दिनांक 1 जुलै2020 रोजी राज्यातील सर्व कंत्राटी कामगार हे काळ्या फिती लावून, काळे झेंडे, व निषेधाचे बोर्ड घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता कार्यालया समोर दुपारी 1 ते 2 दरम्यान एकत्र येऊन निदर्शने करतील

शेवटच्या 4 थ्या व अंतिम टप्यात मंगळवार दिनांक 7 जुलै 2020 च्या 00:00 पासून राज्यातील तिन्ही कंपनीतील सर्व कंत्राटी कामगार मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करतील. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली . दि.12 जुन 2020 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ( संलग्न भारतीय मजदूर)चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहुल बोडके, व कोषाध्यक्ष सागर पवार यांनी संबंधीत केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …