*रस्ता कामासाठी मुरुमाची व ओव्हरलोड वाहतूक गावकऱ्यांनी अडवली*
*रस्ता कामासाठी मुरुमाची व ओव्हरलोड वाहतूक गावकऱ्यांनी अडवली*
वरोरा प्रतिनिधी =जुबेर शेख
माजरी वणी –वरोरा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम कोरेना मुळे बंद होते आता या कामाला गती मिळाली आहे.हे काम सुरू होताच कंपनी ने नंदोरी भटाळी येथून मुरूम रस्ता कामावर आणायचे आहे ही वाहने वरोरा कुचना मार्गे आणायचे आहे परंतु ही वाहने ओव्हरलोड भरून असल्याने टोलटॅक्स वाचविण्यासाठी शॉर्टकट नंदोरी विसलोन पळसगावमार्गे जात आहे विशेष म्हणजे हा खेडूत रस्ता असून याची वाहन क्षमता ९ टन असतांना ३० टन भार क्षमतेचे ट्रॅक आणि टिपर या मार्गाने चालत आहेत त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होत आहेत दरम्यान बुधवारपासून माजरी पाटाळा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण भाऊ सूर यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी ओव्हरलोड टिप्पर अडवून परत पाठविले वणी – वरोरा महामार्गच्या चौपदरिकरणाकरीता वणी- भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील जमीन सपांदित केली आहे पण वणीच्या तुलनेत पाटाळा, नागलोन , कुचना शेंबळ येथील शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला आहे त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांनी मोबदल्याची रक्कम उचललेली नाही या अगोदर शेंबळ रोड च्या कामाची मोजणी करत असतांना शेतकऱ्यांनानी काम रोखले होते रोड च्या कंपनीने मुजोरीने काम करण्याचे ठरविले असेल तरी शेतीचा योग्य मोबदला मिळाल्या शिवाय काम सुरू करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा जी.प.सदस्य प्रवीणभाऊ सूर यांनी घेतला असून नंदोरी, विसलोन ,पळसगाव,या रस्त्याने जी वाहतूक सुरू आहे तीसुद्धा बंद करण्यात यावी अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे दरम्यान या कामाबाबत चे वेवस्थापक राममणि त्रिपाठी यांना विचारणा केली असता आम्ही शासनाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार काम करत असून हे रोड चौपदरीकरणाचे काम शासकीय आहे आम्ही रेती व मुरूम रॉयल्टी धारक मालकाकडून घेत आहे ते जर ओव्हरलोड भरून पाठवत असेल तर त्यामध्ये आमचा काय दोष असे मत मांडले .
रस्त्याचे चौपदरीकरण करणे करीता ज्या कंपनी ला कंत्राट दिले आहे त्यांना ताबडतोब पत्र देऊन या मार्गे वाहतूक बंद करण्यासाठी सांगू अशी माहिती जिल्हा परिषद वरोरा अभियंता विजय दोरखंड यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.