*अरविंद बंसोड़ यांच्या निवासस्थानी भेट आणि सांत्वना*
नरखेड प्रतिनिधी -श्रीकांत मालुधरे
*नरखेड़ –तालुक्यातील पीम्पळधरा या गावातील अरविंद बंसोड़ या अनुसूचित जाती(दलीत) युवकाची काही समाज कंटकानी 27 में रोजी हत्या केली असून अजुनही गुन्हेगार मोकाट फिरत आहे या प्रकरणतील सर्व गुन्हेगारांवर कठोर अशी कार्यवाही व्हावी अशी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा तर्फे मागणी करण्यात आली व संपूर्ण भारतीय जनता पार्टी बंसोड़ कुटुंबियांना न्याय देण्या करीता त्यांच्या पाठीशी उभी आहे.*
*भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मनोजभाऊ चवरे, माझी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रजी शेंडे, जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे आणि नरखेड़ तालुका पदाधिकारी दिलेशजी ठाकरे यांनी भेट दिली जर का लवकरात लवकर गुन्हेगाराना अटक होऊन योग्य ती कार्यवाही नाही झाली तर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्ह्या तर्फे तीव्र अशे आंदोलन करण्यात येईल.*
*गृहमंत्री यांच्या मतदार संघातील त्यांच्या मूळ गावाला लागून असलेल हे पीम्पळगांव असून आता पर्यंत महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दखल नाही घेतली ही शोकांतीका आहे.*