*गुरुजी पोरायची शाळा कव्हा सुरू होईल जी…!*
*ग्रामीण भागातील पालकांचा सवाल*
उपजिल्हा प्रतिनिधी – तुकाराम लुटे
मौदा : कोरोना संकटाच्या पर्शवभूमीवर मार्च महिन्यात सर्व शाळा बंद झाल्या. मुलांच्या परीक्षा पण झाल्या नाही. सर्व मुलांना पुढल्या वर्गात प्रवेश देण्यात आला. ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या सर्व शाळा २६ जून ला सुरू होतात. पण अजूनही कोरोनाचा संकट टळलेला नाही. अजूनही लोकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शाळा केव्हा सुरू होणार याची अनिश्चितीता कायम आहे. मौदा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे मागील दिवसातच सर्व शाळांना पहिली ते आठवी पर्यंत पाठय पुस्तकाचे वितरण करण्यात आले. इयत्ता नववी आणि दहावी त गेलेल्या अनेक विद्य्रथ्यांनी बाजारातून वह्या पुस्तके खरेदी केले आहे. त्यामुळे आता शाळा सुरू केव्हा होणार याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पालक शिक्षक याना गुरुजी शाळा केव्हा सुरू होणार जी असा सवाल करत आहे.