*तरुण शेतकर्याचा कूलर चा शॉक लागून मृत्यू*
*होतकरू युवकाचे आकस्मिक निधनाने गाव स्तब्ध*
*तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे नरखेड सोबत पवन कळंबे जलालखेडा*
भारसिंगीः सुरेश उर्फ भुरा शेषराव ढोपरे वय वर्ष 37 रा.सहजापूर (भारसिंगी) शेतीच्या पेरणीचा वेळ सुरु असताना प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेतीच्या कामात लागला असता .सुरेश ढोपरे आपल्या शेतीच्या पेरणी करता लागणारे साहित्य बघण्या करता कूलर खाली असलेली पेरणीची दाती काढण्या करता हाथ टाकला आणि ती दाती लोखंडाची असून ती कूलर ला लागताच . तीला करंट आला. भारसिंगी (सहजापूर) गावच्या माजी सरपंच कमलाबाई धोपरे यांचा एकुलता एक मुलगा काळाने हिरावला त्यांचे लग्न झालेले असून त्यांना 5 वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा महिन्याचा मुलगा आहे . या दुदैवी दुखत घटने मुळे त्यांच्या कुटुंबाला वर मोठा आघात झाला आहेत .या मुळे परिसरात शोकाकुल वातवरण निर्माण झाले.
आई सरपंच असताना स्वतः पुढाकार घेऊन गावाची रेड झोन मधे असतांना देखील गावाच्या विकासासाठी खूप काही कामे आणली असा तरुण तडपदार व्यक्तीमत्वचा मित्र आपले मधून निघून गेला .म्हणून मित्र मंडळी पण शोकुल झाले.आज काळाने घात केला. आणि पूर्ण गाव व परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण होऊण हळहळ व्यक्त केल्या जात आहे.