*कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे ११ जून पासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले*
नरखेड तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे व जलाखेडा वरून पवन कंळबे
नरखेड़– आज जगावर व भारतावर कोरोना या आजाराने सर्व मानव जाती वर भंयाकर मुत्यूचे संकट निर्माण झाले आहे.पण या संकटाच्या सामना आपल्या जिव मुठीत घेऊन प्रथम कोरोना योद्धा आरोग्य कर्मचारी म्हणून ज्यांना संबोधले जाते त्यांना अनेक समस्या समोर जावे लागते ही खूप लाजी वाणी बाब आहे.
मेंढला , वडविहरा , खापा ,लोहारीसावंगा , रामठी , येथे कंञाटी आरोग्य सेविका आहे. त्यामुळे
सर्व आरोग्य सेवेचा भार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर असल्यामुळे त्या देखील संपावर गेल्या मुळे गावातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उदभवला आहे. फक्त थंडीपवनी , दावसा येथे परमनंट आरोग्य सेविका आहे .
नरखेड तालुक्यातील मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या १५ वर्षांपासून कोणत्याही सवलती देण्यात आलेल्या नाहीत.
या कंत्राटी कर्मचाऱ्यांबद्दल शासनाची भूमिका उदासिन आहे.यासाठी या कर्मचाऱ्यांनी काळ्या फ़िती लावून काम केले. रक्तदान आंदोलन केले पण त्याची दखल घेण्यात आली .नाही.
सध्या स्व संरक्षणासाठी पुरेसे साहित्य नसले तरी हे कर्मचारी कोविड सेवा देत आहेत. व कोरोना योद्धा म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे .
तरीही शासनाने मागण्याची दाखल न घेतल्याने ११ जूनपासून या कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले
सध्या कोरोना पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. राज्यात आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती आहे.त्यामुळेच कंत्राटी कामगारांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काम सुरू ठेवीत टप्याटप्याने आंदोलन केले.परंतु त्याची कोणतीही दखल न घेतल्याने या आंदोलनाच्या अंतीम निर्णायक टप्यात ११ जूनपासून कामबंद आंदोलन व अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येणार आहे.मात्र तत्पूर्वीच शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाकरता सकारात्मक निर्णय घ्यावा अशी. मागणी करणारे निवेदन शासनास राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीतर्फे देण्यात आले आहे.
मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मिथुन घोलपे , वैद्यकीय अधिकारी डॉ साईनाथ तोडकर , यांना निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी आरोग्य सेविका अर्चना विधाते , जयश्री झाडे , कल्पना आंबुलकर , आरोग्य सहाय्यीक करूणा हिवरकर आदींनी दिले