*काटोल -नरखेड मतदार संघातील मनरेगा अंतर्गत योजना, अडीअडचणी, प्रलंबित असणारे कामाचा आढावा बैठक*

*काटोल -नरखेड मतदार संघातील मनरेगा अंतर्गत योजना, अडीअडचणी, प्रलंबित असणारे कामाचा आढावा बैठक*

नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

काटोल नरखेड क्षेत्रातील मनरेगा अंतर्गत येणाऱ्या योजना अडीअडचणी प्रलंबित असणारे कामे


नरखेड़–  मा. ना. अनिलबाबू देशमुख गृहमंत्री हयांच्या सुचेनेनुसार बिजलीघर येथे श्री. सलीलदादा देशमुख सदस्य जिल्हा परिषद नागपूर यांनी आढावा बैठक घेऊन समंधीताशी चर्चा केली. पुढील कामे वैयक्तिक योजना सिंचन विहीर, गोठा, कुकूट पालन शेड, सार्वजनिक असणाऱ्या अभिसरण करून असणाऱ्या योजना, पांधन रस्ते, वृक्ष लागवड इ. मार्गी लावण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी उपस्थित श्री. धम्मपाल खोब्रागडे, सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, श्री वैभव दळवी, सौं. अनुराधा अनुप खराडे उपसभापती, श्री, समीर उमप, कु. दिक्षा मुलताईकर सदस्य जी. प. श्री. भट उपजिल्हाधिकारी मनरेगा नागपूर, सौं. काठोळे, श्री. खंडविकास अधिकारी मनरेगा व सर्व सन्माननीय जी. प. /पं.स. सदस्य उपस्थित होते* .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …