*स्थानिक प्रशासनाची दिशाभुल करणे व मुलीची माहीती लपविणे वडीलास भोवले*
*चनकापूर वेकोली कॉलनीत मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या प्रकरणात वडिलांचे निलंबन*
खापरखेड़ा विशेष प्रतिनिधि
*सावनेर – तालुक्यातील वेकोलि चनकापूर वसाहतीतील एका वेकोलि कर्मचाऱ्याची मुलगी दिल्लीवरून ८ जून रोजी विमानाने प्रवास करून चनकापुर येथे घरी वापस आली. या दरम्यान मात्र संबंधित स्थानिक प्रशासनाला मुलीच्या वडिलांकडून माहिती देण्यात आली नसल्यामुळे प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी नागपूर क्षेत्र महाप्रबंधक गोखले यांनी नुकतेच कोरोना बाधित मुलीच्या वडिलांना निलंबित केले*
*चनकापूर वेकोली बी टाईप वसाहतीत राहणारी मुलगी दिल्ली येथे शिक्षणासाठी गेली होती असे सांगण्यात येत आहे . दिल्लीवरून घरी आल्यानंतर त्या मुलीला घरीच वेगळ्या रुममध्ये क्वारंटाईन ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.पण मुलीच्या वडिलांनी स्थानिक प्रशासनाची दिशाभूल केली असून त्यांनी मुलीला घरीच ठेवले. ग्राम पंचायत अथवा आरोग्य विभाग, पोलिस विभाग अथवा वेकोलि प्रशासनाला सांगणे गरजेचे समजले नाहीत. अचानक मुलींची तब्येत शुक्रवारी बिघडली असताना तीला वलनीतील वेकोलीच्या रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतरही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचे लक्षणे संशयीत वाटताच लागलीच रुग्णवाहिकेने नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.दरम्यान तिचा स्वॅब घेऊन कोव्हिड चाचणी करण्यात आली.शनिवारी कोरोना पाॅजिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर तारांबळ उडाली.लागलीच वेकोलि प्रशासनाचा अधिका-यांनी बी टाईप वसाहतीत जावून भेट देण्यात आली.एकीकडे स्थानिक प्रशासनात या विषयाबाबत वेकोलीविरोधात प्रचंड संताप संचारला होता. याचा परिणाम म्हणून वेकोलीच्या महाव्यवस्थापकाने मुलीच्या वडिलांना पुढील आदेशापर्यत निलंबित करण्यात आल्याची माहिती विश्र्वसनीय सुत्रांकडून मिळाली. सदर कोरोना बाधित युवतीमुळे वेकोलि वसाहतीतील राहणा-या संपर्कात येणाऱ्यांना व वेकोलि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांला क्वारंटाईन व्हावे लागले हे विशेष.*
*मुलीचा रिपोर्ट पाँजेटिव्ह आल्यानंतर सावनेर चे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार दिपक कारंडे तसेच तालुका आरोग्य अधिकारी सोबतच स्थानिक प्रशासन यांनी त्यांच्या घरी जाऊन मुलीच्या संपर्कात आलेल्या विषयी माहीती मागीतली असता वडिलासह संपूर्ण परिवार उडवाउडवीची उत्तरे देत प्रशासनास सहकार्य करत नसल्याचे निदर्शनास येतांच त्यांच्या परिवारास सक्तीने कोरंटाईन करण्यात आले होते*
*आमच्या प्रतिनिधीने सिल्लेवाडा वेकोलि प्रबंधक राजेंद्र ठाकरे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता सदर वेकोली चनकापुर वसाहतीतील कोरोना बाधित प्रकरणातील मुलीच्या वडिलांना पुढील आदेशापर्यंत वेकोली प्रशासनाने निलंबित केले आहे.*