*बेलोना गाव राम भरोसे* *ग्रामसेवक आणि सरपंच याच्यावरील उडत आहे विश्वास*

*बेलोना गाव राम भरोसे*

*ग्रामसेवक आणि सरपंच याच्यावरील उडत आहे विश्वास*

विशेष प्रतिनिधि
बेलोनागावामधे यावर्षी सर्वात ज्यास्त बाधकामे चालू असून काही कामे जोरात पुर्ण झाले तर काही कामे चालू आहे .तर काही कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे, वार्ड क.1आणि वार्ड 5 मधील नाल्ह्याचे काम हे धिमे गतीने सुरू आहे.दोन्ही वार्ड मधील जनतेला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे तरीपण ग्रामसेवक व सरपंच याकडे दुर्लक्ष करत आहे .

जनतेने त्रास सहन करावा तर करावा किती ?

वार्ड क.1आणि 5 मधील काम जेव्हा सुरू झाले तेव्हा वार्ड मधील जनतेला त्या नाल्हीचे बांधकाम चुकीचे होत असल्यामुळे त्यांनी आवज उचला, तर त्या नाल्हीचे बांधकाम ऐका ठेकेदाराकडून दुसऱ्या ठेकेदारांना देण्यात आले त्यामुळे जनतेला साहणभुती मिळाली, कामे चांगले केल्या जाईल तुमच्या म्हण्या प्रमाने नाल्हीचे बांधकाम केल्या जाईल अशी ठेकेदार व गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी ग्वाही दिली .
कोरोना मुळे काम बंद होते त्यामुळे तिथे पायल्या,रेती ,गिटी माती दगडे रोडबरती पडले असल्यामुळे जनतेला खूब त्रास सहन करावा लागला . जनतेनी जेव्हा होत असलेल्या त्रासाबद्दल ग्रामपंचायत मधे तक्रार केली तेव्हा ठेकेदारांनी रेती गिटी महाग असल्यामुळे उचलून नेली पण बोल्ड दगड मात्र स्वस्त असल्यामुळे ते रोडवरतीच पडून राहू दिले पण गावकरी जनता प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी ठेकेदाराला काही म्हटले नाही . ठेकेदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नाल्हीचे काम सुरू करते वेळेस घरासमोरील नाल्ही वरील पायऱ्या रपटे तोडून टाकले ,आम्ही बनवून देऊ तुम्ही काळजी करू नका असे बोलत गेले जनतेला स्वतःच्या घरात प्रवेश कराला खूब त्रास सहन करावा लागला.नाल्हीचे बांधकाम सुरू असताना जनतेनी आवाज उचला की आमच्या दारासमोर असलेल्या पायऱ्या तुम्ही तोडल्या तश्या त्या तुम्ही बाधून द्या अशी विनवणी केली असता ! त्यांना सांगण्यात आले की ही रेती गिटी आहे ते घ्या आणि सिमेंट तुम्ही स्वतः विकत आणा आणि स्वतः बाधून घ्या अशे स्पष्ट नाल्हिवरील मजूर बोलत गेले त्यामुळे वार्ड मधील जनतेची नाराजी वाढत गेली .
गावामध्ये बेरोजगार तरुण असताना बाहेर गावावरून रोजदार कामासाठी बोलावून त्यांना कामे देण्यात आली .ग्रामपंचायतने मनरेगा मधे रोजगार मागतलेल्या तरुण बेरोजगारांना कामे दिली नाही त्यामुळे गावातील बेरोजगार तरुणांनी नाराजी व्यक्त केली.

पावसाळ्याचे दिवस लागले अस्ता त्या बांधकामा कडे पाहण्यासाठी कोणाकडे वेळ नाही सर्व शेतकरी वर्ग असल्यामुळे त्यांना आपल्या शेतात कामे करण्यासाठी जावे लागतात त्यामुळे नाल्हीत कुठे काय प्रकार घडत आहे किंवा
होत आहे हे कोणी पाहू शकत नाही .तसेच कुठे अपुरी नाल्ही करून सोडली आहे तर कुठे नाल्हिवरती रप्टे सुधा टाकलेले नाही . नाल्हि जवळील पाईप लाईन उघडी करून पडली आहे तर त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही पाईप लाईन कोणी फोडेल का यामध्ये कोणी काही टाकेल याची भीती या बांधकाम ठेकेदाराला नाही . त्यामुळे ग्रामपंचायत ठेकेदारा बदल नाराजी व्यक्त होत आहे .लहान मुलांना ये जाण्यासाठी तसेच खेळण्यासाठी खूब त्रास होत आहे, रोडवरती पडलेली मातीचे
ढिगारे उचलून न्याला दिलीप दिवाण यांनी बऱ्याचदा सरपंच आणि काहीप्रतिष्ठित व्यकीना मातीच्या अडचणी बदल सांगितले तर त्यांनी आम्ही ठेकेदाराला उचलवाला लावतो अशे सांगण्यात आले ,तरीपण ठेकेदार मातीचे ढिगारे उचलाला तयार नाही. इथे कोणाचे हात पाय तुटेल तेव्हा उचलून नेईलका अशी गावकरी जनतेची नाराजी ग्रामपंचायत वर होत आहे ,मुल खेळता खेळता कित्येकदा नाल्हित पडत आहे तर रात्रीच्या वेळेस येणारे जाणारे रस्त्यावर पडत आहे . गावकरी जनतेच्या घरासमोरी हा प्रकार घडत असून सुधा याकडे ग्रामपंचायत सदस्य लक्ष देत नाही.जर कोणी ग्रामपंचायत सदस्य बोला तर त्या सदस्याच ठेकेदार काही चालू देत नाही ग्रामपंचायत जर ठेकेदार आहे तर मग अश्या ठेकेदारांना का ठेका देतात की ते जनतेचे समाधान करू शकत नाही आणि फक्त ते आपला स्वार्थ पाहतात .जनतेची नाराजी होत असून पंचायत समिती नरखेड मधील इंजिनियर्स लोहे साहेब यांना विचार पुस करण्याच्या तयारीत तसेच बिडियो कडे जाण्याच्या तयारीत आहे. आणि प्रशासनाने चौकशी बसवावी अशे जनतेचे मत आहे . तसेच बिडियो ( खंड विकास अधिकारी) नरखेड याना प्रश्न विचारणार की तुमचे इंजिनियर कसे निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे कसे मेजरमेट काढून देत आहे. आणि बिल काढण्याकरिता कोणत्या बेसिकवरती एमबी बनवतात. बांधकाम नाल्हीचे कशे ठरवतात. त्यांना तिथल्या परिसरातील जनतेशी संवाद करून जर मेजेरमेंट काढून दिले तर जनतेत नाराजी नसती झाली आणि होणार नाही . तसेच ग्रामपंचायत ने सुधा ठेकेदारी देते वेळेस विचार करून का दिल्या जात नाही . वार्ड क.1आणि 5 मधील नाल्हिचे बाधकामासाठी प्रत्यक्ष दोन्ही वार्ड मधील सुशिक्षित तरुण बेरोजगार असताना सुधा त्यांना बाधकाम का दिल्या गेले नाही .
नाल्हीचे बांधकाम हे 12लाखाचे असून त्या वार्डातील
निलेश बनकर 8 ते 9लाखात करून देतो आणि जनता ज्या प्रमाणे म्हणेल त्याच प्रमाणे काम करून देतो , गावातील वार्ड चे काम आहे तर मी चांगलेच करेल तर मला हे काम द्या तरीपण काही स्वार्धा पणामुळे त्याला काम देण्यात आले नाही . फक्त आणि फक्त गावकरी सर्व साधारण जनता ही ग्रामपंचायतीला कटाळलेली आहे .
बेलोना हे गाव आता फक्त आणि फक्त राम भारोसे आहेत .
या गावात मोठ मोठे मंत्री येऊन जातात पण गावकरी जनतेच्या समस्या त्यांच्या परत पोहचू शकत नाही .त्यामुळे बेलोना गावामधील जनतेची ग्रामपंचायत वरती खूब नाराजी व्यक्त केली आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …