*कुहीचा गुजरीबाजार रामभरोसे*
*दुकानदार व ग्राहकांकडून सोशल डिस्टनसिंग चा फज्जा*
कुही प्रतिनिधि – निखिल खराबे
कुही:- जगभर महामारी म्हणून कोरोना घोषित झाल्यानंतर स्थानिक प्रशासनातर्फे आठवडी बाजारावर बंदी घातली गेली व त्या नंतर लोकांची गर्दी होऊ नये याकरिता कुहीच्या नगरपंचायत तर्फे कुही शहरातील बाजार चौकात असलेला गुजरी बाजार पांडेगाव रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात स्थलांतर करण्यात आला पण पावसाळ्यात तिथे चिखल होऊन बाजारा करिता पूरक वाटत नसल्याने परत नगरपंचायत ने हीच गुजरी जुन्याच जागेवर म्हणजे बाजार चौकात परत भरविली. यातच नगरपंचायत च्या अधिकाऱ्यांचा मासेविक्रेत्यांसोबत वाद झाला होता हे विशेष. सध्या स्थिती गुजरीत दुकानदारांची संख्या वाढली असून जागा कमी असल्याने दाटून भाजीविक्रेते दुकान लावत असून सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडताना दिसत आहे, अनेकांच्या तोंडाला मास दिसत नाही तर बाजार भरवणाऱ्या नगरपंचायत चे कर्मचारी सुद्धा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड करताना दिसत नसून सर्वसामान्य नागरिकांनी करावे तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे ही गुजरी आठवडी बाजाराच्या ठिकाणी म्हणजेच सांस्कृतिक भवन जवळ स्थलांतरित करण्यात यावी तेव्हा जागेचा तुटवडा पडणार नाही व गर्दी नियंत्रित करता येईल अशी चर्चा गावात जोर धरत आहे.