*जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून पोंभुर्णा तालुक्यातील आशा वर्कर यांना अन्नधान्याच्या कीटचे वाटप.
*कोरोणा योद्ध्यांविषयी गौरवोद्गार काढत साधला आशांशी मुक्त संवाद.*
कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे
कोरपना – कोरोणा महामारीच्या जागतिक संकटाला तोंड देत असतांना योद्धे बनून राष्ट्रीय सेवेत कर्तव्य बजाणार्या आशा वर्कर्स यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, या भावनेतून चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी जिल्हाभरातील आशांना अन्नधान्य कीटच्या वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. त्या माध्यमातुन आज पोंभुर्णा पंचायत समितीत तालुक्यांतर्गत येणार्या सर्व आशा वर्कर्सना त्यांनी अन्नधान्याच्या कीटचे वाटप केले.
यावेळी मार्गदर्शनात्मक बोलतांना, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी संसर्गजन्य संशयितांची नोंद होत आहे. अश्यात नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीपोटी सेवा देत रात्रंदिवस खपून तुम्ही अपुऱ्या मानधनातही राष्ट्रीय सेवा बजावून आपले कर्तव्य पार पाडत आहात. याचे मला विशेष कौतुक वाटते. त्यामुळे तुम्हा कोरोणा योद्धांचा सम्मान करणे आणि तुमच्या हाकेला साद देणे हे एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझे कर्तव्य समजते. असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांसमवेत, पं. स. सभापती अल्काताई आत्राम, उपसभापती ज्योतीताई बुरांडे, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामीडवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख, गटशिक्षणाधिकारी मडावी यांसह तालुक्यातील आशा वर्कर्स उपस्थित होत्या.ह