*तिन महीनेचेविज बिल माफ करावे*
*मोवाड शहरात वाजवी पेक्षा जास्त पैसेचे विज बिल आलेमुळे लोकांनाची ओरड*
नरखेड़ तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
नरखेड़– कोरोना या आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून लाँकडाउन असलेल्या मुळे विज ग्राहकांना
महावितरण महाराष्ट्र राज्य विघुत वितरण कंपनी मर्यादित कडून मोवाड शहरात एकत्रित पणे विज बिल या जुन महिनेत विज बिल मोवाड शहरातील ग्राहकांना वितरित करण्यात आले.
शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष वसंतराव वैघ याना विचारले असता विज बिला बद्दल तर त्यांनी असे म्हटले की गेले काही दिवसापासून शेतकरी मजूराना हाताला काम नाही. व सरकारने कापूस खरेदी केला नाही.यामुळे कापूस घरीच पडुन आहे.आणि खाजगी कापूस व्यापारी हे शेतकरी यांच्या कापूस कमी भावात खरेदी करत आहे.यामुळे शेतीला लागणारा खर्च पण निघाला नाही.सध्या पेरणीचे दिवस आहे .पेरणीला पैसे खर्च करा की विज बिल भरावे. कोरोनामुळे शेतीला लागणारे बियाणे व खतांचे व शेती औषधाचे भाव पण वाढले आहे.अशा दुहेरी संकटात अल्प भुधारक शेती जास्त संकट आहे.यामुळे शासनाने शेत मजूर व इतर मजूराचे व अल्प भुधारक शेतकरी याचे तीन महीनेचे विज बिल संपूर्ण माफ करावे.
तसेच किराणा दुकाना दार व भाजी पाला , मेडिकल हे व्यावसायिक सोडलेतर इतर काही व्यावसाय हे आता पर्यंत बंद होते. हे व्यासाईक विज बिल कसे भारणार यांच्या पण महा वितरण विघुत विभागने विचारा करावा. खाजगी नोकरी करणारे याचे पण विज बिल माफ करावेत .अशा प्रकारे मोवाड शहरातील लोकांनाची मागणी आहे