*चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरने घेतली एक हजाराची लाच*
*लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई*
*लाचखोरांचे सहजपणे धाबे दनांनले*
कोरपना प्रतिनिधि -गौतम धोटे
कोरपना– चंद्रपूरला जाण्यासाठी वाहनचालकाला एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१६) करण्यात आली. डॉ.मनोज भिवाजी पेंदाम (४१) असे लाच घेणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे.
डॉ.पेंदाम हे चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तालुक्यातील चित्तरंजनपूर येथील एका वाहन चालकाला चंद्रपूर येथे जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता होती. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे गरजेचे असल्याने त्यांनी डॉ.पेंदाम यांच्याकडे संपर्क केला. मात्र पेंदाम यांनी त्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली असता दरम्यान संबंधित तक्रारदाराने एसीबीकडे संपर्क केला. त्यानुसार मंगळवारी सापळा लावून डॉ.पेंदामला एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वात हवालदार नत्थू धोटे, नायक सतीश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, शिपाई महेश कुकुडकर यांनी कारवाई केली