*रनाळा येथे ब्रम्हलीन तुकारामदादा गीताचार्य पुणयतिथी साजरी*
कामठी प्रतिनिधि
कामठी – तालुक्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर रनाळा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे परमशिष्य ब्रम्हलीन तुकारामदादा गीताचार्य यांची पुण्यतिथी गुरूदेवाच्या नामस्मरणासह गरजूंना धान्य व किराणा दान करून गुरूदेव ग्राम संरक्षण दल महाराष्ट्रच्या वतीने साजरी करण्यात आली.
या वेळी ग्राम संरक्षण दल महाराष्ट्रच्या अध्यक्षा तथा कामठी नगर परिषद च्या माजी गराध्यक्षा मायाताई चवरे, रनाळ्याच्या प्रथम नागरिक सरपंच . सुवर्णा साबळे, समाज सेवक ढुमण गिरी पहेलवान, माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष चलपे समाज सेविका हिरा कावळे, शिला गजभिये मंगला चलपे आदींनी शासनाच्या नियमाचे पालन करीत सामाजिक अंतर ठेवून गुरूदेवाच्या नामस्मरणानी आणि सामुदायिक प्रार्थना घेऊन तुकारामदादाना मानवंदना देण्यात आली दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात येत होते परंतु कोविंड 19 वमानयवरांच्यानयवरांच्या हस्ते गरजूंना धान्य व किराणा वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा असुन आपणच आपल्याला गावाचे संरक्षक असल्याचे आणि कथणी पेक्षा करणी अधिक महत्वाची अशा प्रखर विचाराचे तुकाराम दादा धनी व पुरस्कतेँ असल्याचे मत कार्यक्रमाच्या आयोजिका ग्राम संरक्षण दलाच्या अध्यक्षा मायाताई चवरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने शुभांगी मुलमुले उषा नेतांम सीमा चलपे शारदा गिरी वैशाली राऊत सुनिता गिरी लांजेवार ताई उपस्थित होते