*मायक्रो फायनान्स कंपन्याकडुन फसवणूक* *कारवाई करा गु्हमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश*

*मायक्रो फायनान्स कंपन्याकडुन फसवणूक*


*कारवाई करा गु्हमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश*

*विशेष प्रतिनिधी नागपूर*

*नागपूर – मायक्रो फायनान्स कंपनीकडून ग्रामीण भागातील कर्जदारांची व विशेषतः महिला कर्जदारांची लुबाडनूक करण्याचे प्रकार समोर येत आहे.सदर प्रकार खपवून घेतल्या जाणार नसुन अश्या मायक्रो फायनान्स कंपन्या व त्याच्या कर्मचारी आधिकार्यांवर तात्काळ कारवाई करावी असे निर्देश राज्याचे गु्हमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत*
*मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या पिडीत महिलांनी नुकतीच मा.गु्हमंत्री अनिल देशमुख यांची नागपूर येथे भेट घेऊण कंपनीकडून होत असलेली लुबाडणूकीची तक्रार करुण.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील तीन महिन्यापासून हाताला काम नाही,खायलां अन्न नाही भारत सरकार व राज्य शासनाचे दिशानिर्देशा नुसार लाँकडाऊन सुरु आहे अश्यात कोरोना काळात कोणत्याही बँका किंवा अन्य पतपुरवठा करणार्या संस्थांनी कर्ज वसुली करु नये असे दिशानिर्देश रिझर्व बँक आँफ इंडिया ने दिले असतांनाही मायक्रो फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी कर्मचारी ग्रामीण भागात जाऊण सक्तीची कर्ज वसुली करत आहेत.तसेच कोणताही अधिकार नसतानाही महिलांच्या घरितील वस्तु जप्त करत असुन मायक्रो फायनान्स कंपनी त्याचे कडून अव्वाचासव्वा व्याज तर वसुलतच आहे सोबतच दर महिन्याला 2 ते 4 टक्के अधिक व्याजाची वसुली करत आहे हे कोणत्याही नियमात बसत नसुन केवळ ग्रामीण महिलांच्या अशिक्षित पणा व असाहायतेचा फायदा घेतल्या जात असल्याचे तसेच सदर प्रकार योग्य नसून या कंपन्या वर फौजदारी कारवाई करण्याची मागणी महिलांनी मा.गु्हमंत्री यांना केली असता वरिल बाबींवर अश्या गैरवर्तन करणार्या मायक्रो फायनान्स सोबतच अन्य कंपन्या वर कारवाई करण्याचे आश्वासन याप्रसंगी दीले*
*महिलांनी दिलेल्या निवेदनात एस.के.एस.मायक्रो फायनान्स प्रा.ली.रामटेक. ई.ऊस.ए.एफ.मायक्रो फायनान्स, चेन्नई, स्पंदना स्फुर्ती फायनांशीयल लीमी.रामटेके भारतीय समु्ध्दी फायनान्स लिमी.नागपूर उत्कर्ष फायनान्स रामटेक,महिन्द्रा फायनान्स रामटेक,इक्विटास फायनान्स रामटेक,श्रीराम सीटी फायनान्स रामटेक,बजाज फायनान्स इत्यादी कंपन्याची नावे पिडीत महिलांनी एका निवेदनाव्दारे गु्हमंत्री अनिल देशमुख यांना सादर केले आहे*
*मा.गु्हमंत्री यांच्या आश्वासनाने महिलांना तत्पुर्ता दिलासा जरि मीळाला असला तरी अश्या गडगंज असलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्यावर केव्हा व कोणत्या प्रकारची कारवाई होते याकडे संपूर्ण ग्रामीण भागातील महिलांचे लक्ष वेधले आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …