*नेरी – जांभूळघाट रस्त्यावर अपघातात एक लहान मुलगा ठार तर दोघे जखमी*

*नेरी – जांभूळघाट रस्त्यावर अपघातात एक लहान मुलगा ठार तर दोघे जखमी*

विशेष प्रतिनिधि

चंद्रपूर :चिमूर – नेरी जांभूळघाट रस्त्यावर आज दि 19 जून ला चार चाकी दोन वाहनात अपघात होऊन चिमूर चे तलाठी बंडू मडावी जखमी झाले तर त्यांचा मुलगा हा ठार झाला असून उपजिल्हा रुग्णालया उपचार व शवविच्छेदन साठी आणण्यात आले.
चिमूर सांजा चे तलाठी बंडू मडावी हे आपल्या स्वतःच्या वाहन क्र MH 31 F 8482 या वाहनाने जांभूळघाट वरून लग्न आटोपून नेरी कडे येत होते त्यांच्या सोबत त्यांचा लहान मुलगा दक्षु व पत्नीची बहीण बसून येत होते तर नेरी वरून जांभूळघाट कडे पिकअप वाहन क्र MH 40 AK 4621 वाहनाने येत असताना दोन वाहनात जोरदार धडक होऊन अपघात झाला असून अपघातात कु दक्षु मडावी 4 वर्ष हा ठार झाला असून बंडू मडावी तलाठी व त्याची पत्नीची बहीण पल्लवी तुमराम वय 20 वर्ष ही जखमी झाली असून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिकअप वाहनाचा चालक किशोर ठाकरे वय 24 वर्ष हा सुद्धा जखमी झाला असून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चिमूर पोलीस पुढील कार्यवाही करीत आहे

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …