*कळमेश्वरात कोरोना चा पहिला रुग्ण आढळल्याने चिंतेत वाढ*
*तहसील प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अलर्ट*
तालुका विशेष प्रतिनिधी
कळमेश्वर- कळमेश्वर ब्राह्मणी शहरातील ब्राह्मणी भागांमध्ये दिनांक 19 जून 2020 रोजी शुक्रवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला मुंबई येथून सदर रुग्ण परिवारासह कळमेश्वर रात आल्याची माहिती असून त्याचा पॉझिटिव्ह अहवाल मुंबई येथील आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याने मुंबई आरोग्य प्रशासनाने लगेच तहसीलदार कळमेश्वर यांना कळविले.
त्यामुळे कळमेश्वर शहरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार सदर रुग्ण हा मुंबई येथे काम करीत असून तो परिवारातील मोठा भाऊ, वहिनी ,पत्नी, सासू आणि मेहुणी सह कारणे 13 जून रोजी कळमेश्वर येथे आला तत्पूर्वी त्याने सासू आणि मेहुणी यांना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील लिंगा गावांमध्ये सोडले त्यानंतर सर्वजण कळमेश्वर ब्राम्हणी शहरातील वार्ड क्रमांक 4 येथील दुर्गे लेआउट परिसरामध्ये असलेल्या घरी आले आणि आज दिनांक 19 रोजी यातील एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने.
तहसील प्रशासन नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग खडबडून जागे झाले लगेच तहसीलदार कळमेश्वर सचिन यादव यांनी सदर रुग्णाशी मोबाईलद्वारे संपर्क करून त्याची हिस्ट्री विचारली या हिस्ट्री मध्ये रुग्णाने आपण मुंबईवरून आल्याची माहिती दिली लगेच तहसील प्रशासनाने सदर घराला आणि रुग्णाला भेट देऊन सर्वांना नागपूर येथे पाचपावली परिसरामध्ये क्वॉरेन टाईन करिता हलविण्यात आले तसेच दोन दिवसापूर्वी रुग्णाची बहीण गडचिरोली येथे गेल्याने गडचिरोली प्रशासनाला सुद्धा अलर्ट करण्यात आले तहसील प्रशासनाने रुग्ण राहतो तो परिसर आणि गल्ली सर्व सील केला असून हा परिसर 28 दिवस सिल राहणार.
असल्याची माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी दिली घटनास्थळावर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमरीश मोहबे, तहसीलदार सचिन यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सरंबळकर, ठाणेदार मारुती मुळूक मुख्याधिकारी स्मिता काळे नगरपालिका आणि तहसील प्रशासनाचे आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हजर होते.